AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share Market: आज 10 स्टॉक्सवर लक्ष ठेवा, भरघोस पैसा कमावण्याची चांगली संधी, लिस्ट एकदा पाहा…

आज महिन्याच्या शेवटी म्हणजे 31 जुलै 2026 रोजीच्या आजच्या ट्रेडिंग सत्रादरम्यान अनेक प्रमुख कंपन्यांचे शेअर्स चर्चेत राहण्याची शक्यता आहे. नुकतेच जाहीर झालेल्या जून तिमाहीच्या (Q1) निकालांनंतर, या स्टॉक्समध्ये मोठी चढ-उतार दिसून येऊ शकते.

Share Market: आज 10 स्टॉक्सवर लक्ष ठेवा, भरघोस पैसा कमावण्याची चांगली संधी, लिस्ट एकदा पाहा...
| Updated on: Jul 31, 2026 | 8:30 AM
Share

गुरुवार 31 जुलै 2026 रोजीच्या आजच्या ट्रेडिंग सत्रादरम्यान अनेक प्रमुख कंपन्यांचे शेअर्स चर्चेत राहण्याची शक्यता आहे. नुकतेच जाहीर झालेल्या जून तिमाहीच्या (Q1) निकालांनंतर, या स्टॉक्समध्ये मोठी चढ-उतार दिसून येऊ शकते. काही कंपन्यांनी अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली, तर काहींचे निकाल बाजाराच्या अपेक्षेपेक्षा कमकुवत होते. गुंतवणूकदार या 10 प्रमुख स्टॉक्सवर लक्ष ठेवून असतील, ज्यांच्यामध्ये ट्रेडिंग दरम्यान लक्षणीय हालचाल दिसू शकते.

टाटा स्टील टाटा स्टीलने जून तिमाहीसाठी संमिश्र निकाल जाहीर केले. कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 11.6% ने वाढून ₹2,318.4 कोटी झाला, परंतु हा आकडा बाजाराच्या अपेक्षेपेक्षा किंचित कमी होता.

LIC हाउसिंग फायनान्स

एलआयसी हाउसिंग फायनान्सचा निव्वळ नफा जून तिमाहीत 9.9% ने वाढून ₹1,499 कोटी झाला.  कंपनीचे निव्वळ व्याज उत्पन्न किंचित वाढून 0.6% ने ₹ 2,087 कोटींवर पोहोचले.

थर्मॅक्स अभियांत्रिकी कंपनी थर्मॅक्ससाठी तिमाही कमकुवत ठरली. कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 83.4% ने घसरला. महसूल वाढला असला तरी, वाढत्या खर्चामुळे नफ्यावर दबाव राहिला.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स सरकारी मालकीच्या संरक्षण कंपनी माझगाव डॉक शिपबिल्डर्सने दमदार तिमाही निकाल जाहीर केले. निव्वळ नफा 21.5% ने वाढून ₹549.4 कोटी झाला, तर महसूल  12.1 % ने वाढून ₹2,943 कोटी झाला.

न्यूक्लियस सॉफ्टवेअर एक्सपोर्ट्स न्यूक्लियस सॉफ्टवेअर एक्सपोर्ट्सची कामगिरी खराब झाली. निव्वळ नफा 32.2% ने घसरून ₹23.87 कोटी झाला. दरम्यान, महसूल 3.35% ने घसरून ₹ 210.43 कोटी झाला, जे कंपनीवरील दबाव दर्शवते.

जेबीएम ऑटो ऑटो आणि ईव्ही क्षेत्रातील कंपनी जेबीएम ऑटोने निव्वळ नफ्यात 14.7% वाढ नोंदवली. इलेक्ट्रिक वाहन आणि ऑटो घटक व्यवसायातील मजबूत मागणीमुळे कंपनीला फायदा झाला.

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सरकारी मालकीच्या रेलटेलचा निव्वळ नफा 66 कोटी रुपयांवर जवळपास स्थिर राहिला. कंपनीच्या महसुलात आणि परिचालन नफ्यात लक्षणीय वाढ नोंदवली गेली.

स्विगी ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीचा जून तिमाहीतील तोटा कमी होऊन 791 कोटी रुपयांवर आला. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीला 1.179 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. कंपनीचा व्यवसाय बाजाराच्या अपेक्षेनुसार होता.

चंबळ फर्टिलायझर्स अँड केमिकल्स चंबळ फर्टिलायझर्स अँड केमिकल्सचा एकत्रित निव्वळ नफा 4.6% ने घसरून 544 कोटी रुपयांवर आला. मागील तिमाहीच्या तुलनेत परिचालन कामगिरीत सुधारणा झाली.

टोरेंट फार्मास्युटिकल्स औषधनिर्माण कंपनी टोरेंट फार्मास्युटिकल्सने तिमाही निकालांमध्ये चांगली कामगिरी नोंदवली. निव्वळ नफा 3.3% ने वाढून ₹566 कोटी झाला. महसूल 54.8% ने वाढून ₹4,291 कोटी झाला. कंपनीला देशांतर्गत आणि अमेरिकेच्या बाजारपेठेतील मजबूत मागणीचा फायदा झाला.

Follow Us
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक, नेमकं कारण...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बडा नेता शिंदे गटात...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बड्या नेत्याचा समर्थकांसह शिंदे गटात प्रवेशाचा निर्णय
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक कलांमध्ये ट्रम्प यांना मोठा धक्का
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण...
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण समोर
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवार..
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवारांवरच केला आरोप!
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध नाही, केवळ...
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!