
दिवाळीत सोन्यासोबतच चांदी खरेदी पण अनेक ग्राहक करतात. चांदीचे शिक्के, चांदीची नाणी अथवा चांदीची देवी, गणपती खरेदी अनेक जण करतात. चांदीचा दिवा, पणतीची पण खरेदी करण्यात येते. पण चांदीत फसवणुकीचे प्रकार अनेकदा होतो. त्यामुळे खरेदीच्या धांदलीत तुमची फसवणूक होणार नाही याची अधिक काळजी घेतल्यास दिवाळीच्या आनंदावर विरजण पडणार नाही. पण चांदीची शुद्धता तपासणार कशी? जाणून घ्या.
स्वस्ताईच्या नादात फसवणूक
लग्नकार्य, पूजेत ठेवण्यासाठी चांदीचे शिक्के गिफ्ट म्हणून देण्यात येतात. पण त्याच्या शुद्धतेविषयची हमी कोणी देत नाही. केवळ सराफा व्यापारावरील विश्वासातून ही खरेदी करण्यात येते. काही ज्वेलर्स तर अशा सणासुदीत ग्राहकांना गंडवतात. चांदीला पाणी लागू देऊ नका. शिक्क्याला जास्तवेळ हातात ठेऊ नका असा निरोप तेवढा ते देतात. छोटे दुकानदार अथवा रस्त्यावरील विक्रेते अशी फसवणूक अधिक करत असतात असा आरोप होतो. कारण या नाण्यातील चांदी 80 टक्क्यांहून कमी असते. त्यात निकेल,झिंक वा टिन यासारख्या धातुचा वापर अधिक असतो. दिसायला ही नाणी अगदी चांदीची वाटतात. पण काही दिवसांनी ती काळी पडतात.
याकडे लक्ष द्या
विना हॉलमार्क चांदी खरेदी करु नका : कोणत्याही दुकानातून चांदी खरेदी करताना, शिक्के खरेदी करताना त्यावर BIS शिक्का असल्याचे तपासा. विना हॉलमार्क चांदी खरेदी करु नका.
फसवणुकीची भीती : अनेक नाण्यांमध्ये, तुकड्यांमध्ये इतर धातु मिसळून चांदी असल्याचे भासवले जाते. तेव्हा ते तपासून घ्या.
विक्री करताना फटका : असा धातु,शिक्के अथवा पत्रा विक्री करायला गेल्यास त्याला भाव मिळत नाही
बिल जरूर मागा : अनेकदा लोकल दुकानदार बिल देत नाहीत. तेव्हा जीएसटी लागला तर चालेल पण दुकानदाराकडे बिल मागा
100 ग्रॅम चेनमध्ये किती चांदी
चांदीच्या दागिन्यामध्ये साधारणपणे 92.5 टक्के शुद्ध चांदीचा वापर होतो. त्याचा अर्थ 100 ग्रॅम चेनमध्ये 92.5 ग्रॅम टक्के चांदी असते. तर उर्वरीत भाग हा इतर धातुचा असतो. त्यामुळे हे दागिने टणक आणि मजबूत होतात. पण काही ज्वेलर्स हे ग्राहकांना जी चांदी देतात, त्यात केवळ 80 टक्के वा त्यापेक्षाही कमी चांदीचा वापर होतो. त्यात इतर धातुची भेसळ अधिक असते. ग्राहकांची फसवणूक करण्यात येते.
खरी आणि नकली चांदी अशी ओळखा
हॉलमार्क तपासा – दिवाळीत चांदी खरेदी करत असाल तर चांदीवरील हॉलमार्क जरूर तपासा चांदीवर 925 वा BIS मार्क जरुर तपासा
बर्फाची चाचणी – खऱ्या चांदीवर बर्फाचा तुकडा टेकवला असे तो लवकर वितळतो. तर नकली चांदी असेल तर बर्फाचा तुकडा लवकर वितळत नाही.
चुंबकाचा वापर – जर नकली चांदी असेल तर चुंबकाकडे लगेच ती आकर्षीत होते. पण जर खरी चांदी असेल तर ती चांदीला चिकटत नाही.