AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाजार भावापेक्षा 500 रुपयांनी स्वस्त खरेदी करा सोनं, अशी आहे खास योजना

देशातील दुसर्‍या क्रमांकाची सरकारी बँक पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) लोकांना स्वस्त सोनं (Cheap Gold) खरेदी करण्याची धमाकेदार संधी देत ​​आहे.

बाजार भावापेक्षा 500 रुपयांनी स्वस्त खरेदी करा सोनं, अशी आहे खास योजना
सॉवरेन सोन्याच्या बाँडवर कोणताही कर नाही : रिव्हर्व बँकेने जारी केल्यानुसार सॉवरेन गोल्ड बाँड सर्वात सुरक्षित मानला जातो. सोन्याच्या बाँडची किंमत एका ग्रॅम सोन्यानुसार निश्चित केली जाते. गुंतवणूकदार त्यांना इच्छित असल्यास ते ऑनलाईन किंवा रोख खरेदी करू शकतात. गुंतवणूकदाराने भरलेल्या रकमेनुसार बॉण्ड्स दिले जातात. जेव्हा बाँड परिपक्व होते, तेव्हा ते सोडविले जाते आणि त्यावर नफा होतो.
| Edited By: | Updated on: Feb 02, 2021 | 9:35 AM
Share

मुंबई : कोरोनाच्या संकटानंतर आता कुठे अर्थव्यवस्था स्थिरावण्यास सुरुवात झाली आहे. अशाता गुंतवणूक आणि सोनं (Gold) खरेदीकडे लोकांची पाऊलं पुन्हा वळली आहेत. त्यामुळे तुम्हालाही सोनं खरेदी करायचं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. देशातील दुसर्‍या क्रमांकाची सरकारी बँक पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) लोकांना स्वस्त सोनं (Cheap Gold) खरेदी करण्याची धमाकेदार संधी देत ​​आहे. खरंतर, 1 फेब्रुवारी 2021 पासून सॉवरेन गोल्ड बाँड योजनेची (Sovereign Gold Bond Scheme) 11 वी मालिका सुरू केली जाणार आहे. यामध्ये तुम्ही 1 ते 5 फेब्रुवारी 2021 पर्यंत गुंतवणूक करू शकता. (sovereign gold bond punjab national bank offers to buy gold at discount rs 500 per to gram)

या योजनेमध्ये सगळ्यात खास म्हणजे ऑनलाईन खरेदीवर प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट देण्यात येणार आहे. पीएनबीने ट्विटकरून यासंबंधी माहिती दिली आहे. RBI ने सोन्याच्या बाँडची इश्यू किंमत प्रति ग्रॅम 4,912 रुपये निश्चित केली आहे. यामध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि डिजिटल माध्यमातून पैसे भरण्यासाठी तुम्हाला प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट मिळणार आहे. म्हणजेच जर तुम्ही ऑनलाइन सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला प्रति 10 ग्रॅम 500 रुपयांची सूट मिळेल.

सार्वभौम गोल्ड बाँड योजनेचा लाभ

– पीएनबीने ट्वीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, सॉवरेन गोल्ड बाँड योजना ग्राहकांसाठी खास आहे. यामध्ये तुम्ही स्वस्तात सोनं खरेदी करू शकता

– इतकंच नाही तर इथे सोनं खरेदी करण्याची प्रक्रियाही सोपी आहे.

– सुरक्षित आणि नफा असणारी ही गुंतवणूकी तुम्ही थेट डीमॅट स्वरूपात ठेवू शकता.

– सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सॉवरेन गोल्ड बॉन्डवर कर्जाची सुविधा देखील देण्यात आली आहे.

– यामध्ये तुम्ही स्टॉक एक्सचेंजवर देखील व्यापार करू शकता.

किती खरेदी करू शकता सोने ?

– या योजनेंतर्गत वैयक्तिक गुंतवणूकदार आणि हिंदू अविभाजित कुटुंब आर्थिक वर्षात किमान 1 ग्रॅम आणि जास्तीत जास्त 4 किलो सोन्याची खरेदी करू शकतात.

– ट्रस्ट आणि इतर अशा युनिट्स दर वर्षी 20 किलो सोन्याची खरेदी करू शकतात.

– बँक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून गोल्ड बाँडची विक्री होईल.

कसा ठरणार सोन्याचा भाव?

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, सॉवरेन गोल्ड बाँडचा दर आरबीआय निश्चित करत. आरबीआय जानेवारीत 27 ते 29 दरम्यान सोन्याच्या सरासरी किंमती जारी करते. यावेळी किंमत प्रति ग्रॅम 4,912 रुपये आणि प्रति 10 ग्रॅम 49,120 रुपये निश्चित करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत आरबीआय 24 कॅरेट सोन्याचा बॉन्ड जारी करते.

सॉवरेन गोल्ड बाँडची खास वैशिष्ट्ये

– भारत सरकारच्या वतीने आरबीआय सॉवरेन गोल्ड बाँड जारी करतं. बाँडमधील गुंतवणूकदार एका ग्रॅमच्या गुणामध्येही गुंतवणूक करू शकतात.

– यामध्ये गुंतवणुकीचा कालावधी हा 8 वर्ष ठरवण्यात आला आहे. (sovereign gold bond punjab national bank offers to buy gold at discount rs 500 per to gram)

संबंधित बातम्या – 

Gold Silver Price Today : कस्टम ड्युटी कमी करुनही सोने एवढे कसे महागले? वाचा आजचे दर

5 लाख लोकांना रोजगार देण्याची रामदेव बाबांची घोषणा, काय आहे प्लॅन वाचा सविस्तर !

सफरचंद ते मद्यपान, सेस लागू, काय स्वस्त, काय महाग?

(sovereign gold bond punjab national bank offers to buy gold at discount rs 500 per to gram)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.