AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सफरचंद ते मद्यपान, सेस लागू, काय स्वस्त, काय महाग?

केंद्र सरकारने केलेल्या घोषणेनुसार अ‍ॅग्री इन्फ्रा डेव्हलपमेंट सेस (Agri Infra Development Cess) ही 2 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे.

सफरचंद ते मद्यपान, सेस लागू, काय स्वस्त, काय महाग?
IndusInd Bank
| Updated on: Feb 02, 2021 | 7:46 AM
Share

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 मध्ये सरकारने आरोग्य क्षेत्रातील खर्चाची वाढ केली आहे (Agriculture Cess Effects You From Today), त्यामुळे याची भरपाई करण्यासाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. यापैकीच एक म्हणजे एग्रीकल्चरल सेस (Agriculture Cess) किंवा अ‍ॅग्री इन्फ्रा डेव्हलपमेंट सेस. विशेष म्हणजे हा सेस आजपासूनच लागू करण्यात येणार आहे (Agriculture Cess Effects You From Today).

केंद्र सरकारने केलेल्या घोषणेनुसार अ‍ॅग्री इन्फ्रा डेव्हलपमेंट सेस (Agri Infra Development Cess) ही 2 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. त्यामुळे दररोजच्या गरजेच्या वस्तू आणि इतर अनेक वस्तूंवर याचा परिणाम होणार आहे. आजपासूनच याचा असर तुमच्या खिशावर होणार आहे. त्यामुळे कुठल्या वस्तूंवर आणि किती टक्के अ‍ॅग्री इन्फ्रा डेव्हलपमेंट सेस लावण्यात आलाय जाणून घ्या…

या वस्तूंवर अ‍ॅग्री इन्फ्रा डेव्हलपमेंट सेस आकारण्यात येणार

1. पेट्रोल-डिझेलवर अनुक्रमे 2.5 रुपये आणि 4 रुपये प्रती लीटर

2. सोने-चांदीवर 2.5 टक्के

3. मद्यावर 100 टक्के

4. कच्‍च्या पाम तेलावर 17.5 टक्के

5. कच्‍चे सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावर 20 टक्के

6. सफरचंदावर 35 टक्के

7. युरिया सारख्या फर्टीलायझरवर 5 टक्के

8. मटारवर 40 टक्के

9. काबुली चणावर 30 टक्के

10. मसूरवर 20 टक्के

11. कपाशीवर 5 टक्के

सफरचंद खाणे महागणार

सफरचंद हे फळ अनेकांच्या डेली रुटीनमध्ये असते. कारण हे फळ 12 महिने मिळतं. कधी याचे धर स्वस्त होतात तर कधी महागतात. पण, आधीच्या अपेक्षेनुसार हा आजपासून आणखी महाग होणार आहे. कारण, सरकारने सफरचंदावर 35 टक्के अ‍ॅग्री इन्फ्रा डेव्हलपमेंट सेस आकारण्यात येणार आहे.

खाण्याच्या तेलावर सेस, पण कस्टम ड्युटी घटली

सरकारने कच्च्या पाम तेलावर 17.5 टक्के, कच्च्या सोयाबीन आणि सनफ्लावर तेलावर 20 टक्के अ‍ॅग्री इन्फ्रा डेव्हलपमेंट सेस लावण्यात आला आहे. पण, ग्राहकांवर या कराचा अतिरिक्त बोजा वाढू नये म्हणून यावरील बेसिक कस्टम ड्युटीत (बीसीडी) घसरण करण्यात आली आहे. त्यामुळे तेलाचे भाव वाढणार नाही (Agriculture Cess Effects You From Today).

सोने-चांदी महागणार

अर्थसंकल्पात सोने आणि चांदीच्या उत्पादन शुल्कात 5 टक्क्यांची घसरण करण्यात आली आहे. याला 12.5 टक्क्यांवरुन घट करुन 7.5 टक्क्यांवर आणण्यात आलं आहे. तर सोने-चांदीच्या बिस्कीटांवरील सीमा-शुल्कही घटवण्यात आलं आहे. अशात एप्रिल महिन्यात सोने-चांदी स्वस्त होण्याची शक्यता आहे. पण, सरकारने सोने आणि चांदीवर 2.5 टक्के अ‍ॅग्री इन्फ्रा डेव्हलपमेंट सेस लावण्यात आला आहे. अशात सेने-चांदीच्या किमतीत वाढही होऊ शकते.

पेट्रोल-डिझेलही महागणार

अर्थसंकल्पात पेट्रोलवर 2.5 रुपये प्रति लीटर आणि डिझेलवर 4 रुपये प्रति लीटरप्रमाणे अ‍ॅग्री इन्फ्रा डेव्हलपमेंट सेस लावण्यात आला आहे. अशात यांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

मद्यपान करणेही महागणार

मद्यपान करणेही आजपासून महागणार आहे. कारण अर्थसंकल्पात अल्कोहोलिक बेव्हरेजवर (Alcoholic Beverages) 100 टक्के अ‍ॅग्री इन्फ्रा डेव्हलपमेंट सेस लावण्यात आला आहे. त्यामुळे मद्याचे दर दुप्पट होणार आहेत.

Agriculture Cess Effects You From Today

संबंधित बातम्या :

Budget 2021: फडणवीस साहेबांच्या ‘त्या’ प्रामाणिकपणाबद्दल अभिनंदन; अजितदादांची टोलेबाजी

Education Budget 2021: देशातील सैनिक स्कूलची संख्या वाढणार, नवीन 100 सैनिक स्कूल कशी सुरु होणार?

Budget 2021: बजेट देशासाठी हवं, निवडणुकांसाठी नको; मुख्यमंत्र्यांचा टोला

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.