Budget 2021: बजेट देशासाठी हवं, निवडणुकांसाठी नको; मुख्यमंत्र्यांचा टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका केली आहे. (cm uddhav thackeray slams bjp over union budget)

Budget 2021: बजेट देशासाठी हवं, निवडणुकांसाठी नको; मुख्यमंत्र्यांचा टोला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका केली आहे. बजेट देशासाठी हवं, निवडणुकांसाठी नको, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका केली. (cm uddhav thackeray slams bjp over union budget)

डोंबिवलीतील मनसे कार्यकर्त्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. आता तुम्हाला भेटायला आलो म्हणून बोलायचं म्हणून काहीही बोलणार नाही. मी थोडा अवधी घेऊन बोलेल. पण जे काही ऐकायला आलंय त्यावरून बजेट देशासाठी हवा, निवडणुकांसाठी नको, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. अर्थसंकल्पाची सर्व माहिती घेऊन त्याचा सारांश समजून घेऊन मी त्यावर भाष्य करेल, असंही ते म्हणाले.

मनसेला खिंडार

डोंबिवलीतील मनसेचे पदाधिकारी राजेश कदम, सागर जेधे, दीपक भोसले, अर्जुन पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थानी येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी नागरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील शिवसेना नेते उपस्थित होते. शिवसेनेत सर्वांचं स्वागत आहे. कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेची ताकद आहेच. पण ती अजून वाढत आहे. सर्वच ठिकाणी विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी भगव्याखाली येत आहेत. या तरुणांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याचं काम आम्ही करू, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

महाराष्ट्रासाठी बजेटमध्ये काय?: आदित्य ठाकरे

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. अर्थसंकल्पात बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत. पण हायड्रोजन मिशन एअर पोल्युशनबाबत त्यात काहीच नाही. तसेच काही राज्यात निवडणुका आहेत. त्यांच्यासाठी अधिकच जास्त गिफ्ट देण्यात आलं आहे. त्या तुलनेत महाराष्ट्र आणि मुंबईला काय मिळालं हे शोधावं लागेल, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.

मरणाच्या दारात नेऊन ठेवलं: अजित पवार

कोरोना विषाणूची लस शोधून देशातील शास्त्रज्ञांनी जनतेला जीवनदान दिलं असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पानं देशातील जनतेला पुन्हा एकदा मरणाच्या वाटेवर नेऊन ठेवलं आहे. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांपासून गेल्या कोरोनाकाळात रोजगार गमावलेल्या कोट्यवधी युवकांच्या पदरी निराशाच पडली आहे,” अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. (cm uddhav thackeray slams bjp over union budget)

 

संबंधित बातम्या:

Union Budget 2021 Marathi LIVE : पुण्यात पेट्रोल-डिझेल अधिभाराविरोधात मनसेचं आंदोलन

अर्थसंकल्पानं देशातील जनतेला मरणाच्या वाटेवर नेऊन ठेवलं; अजित पवारांची जहरी टीका

Budget 2021: निवडणुका असलेल्या राज्यांना जास्त गिफ्ट; महाराष्ट्रासाठी काय?; आदित्य ठाकरेंचा सवाल

(cm uddhav thackeray slams bjp over union budget)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI