Soybean Price : अवकाळी पावसाने सोयाबीन हातचे गेले, तरीही भाव गडगडणार..ही आहेत कारणे

Soybean Price : अवकाळी पावसाने झोडपल्याने सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे. तरीही सोयाबीनच्या किंमती वाढल्या नसून उलट कमी झाल्या आहेत..

Soybean Price : अवकाळी पावसाने सोयाबीन हातचे गेले, तरीही भाव गडगडणार..ही आहेत कारणे
सोयाबीनचे भाव गडगडणार
Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Oct 12, 2022 | 5:57 PM

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून बेमोसमी पावसाने (Heavy Rain) सोयाबीन पिकाचे (Soybean) मोठे नुकसान झाले आहे. परिणामी सोयाबीनचे भाव वाढतील असा जर तुम्ही विचार करत असाल तर हा अंदाज साफ खोटा ठरला आहे. कारण सोयाबीनच्या किंमती (Soybean Price) आणखी उतरल्या आहेत. त्यात घसरण होण्याची शक्यता आहे.

येत्या काही दिवसात सोयाबीनचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. बाजाराचा कल पाहता पुढील काही दिवसात सोयाबीनचा भाव घसरुन 4,500 रुपये प्रति क्विंटलच्या ही खाली जाण्याची शक्यता आहे.

ओरिगो ई-मंडीच्या वायदे बाजाराचे प्रमुख संशोधक तरुण सत्संगी यांनी सांगितले की, मध्यप्रदेश हे सोयाबीनचे सर्वात मोठा उत्पादक राज्य आहे. या राज्यात जोरदार पावसामुळे 1,92,000 मेट्रिक टन सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे.

एकूण सोयाबीन पेऱ्यापैकी जवळपास 4 टक्के पीक हातचे गेले आहे. राजस्थान राज्यातही अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे. जोरदार पावसामुळे 1,50,000 मेट्रिक टन सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. 675 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. राजस्थानच्या कोटा जिल्ह्यात सोयाबीनचे 20 ते 25 टक्के नुकसान झाले आहे.

जून 2022 पासून सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घसरण झाली आहे. 2022-23 या वर्षात सोयाबीनचे उत्पादन 12.14 मिलियन मॅट्रिक टन होईल असा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा 1.6 टक्के जादा आहे.

तसेच सोयाबीनचा 3.25 मिलियन मॅट्रिक टन साठा अजूनही शिल्लक आहे. त्यामुळे सोयाबीनच्या किंमती घसरलेल्या आहेत. सध्या सोयाबीनचा भाव 5,390 रुपये प्रति क्विंटल पेक्षा ही कमी आहे. तो येत्या काही दिवसात 4,500 रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी होण्याची भीती आहे.