Success Story: उपासमारीने झाडाची साल खावी लागली, तरीही बनवला जगातला सर्वात मोठा कार ब्रँड

आज जगातील एक महत्वाचा कार ब्रँड असलेल्या हुंडई कार कंपनीचा पसारा दक्षिण कोरियावरुन संपूर्ण जगात पसरला आहे. त्यांच्या संस्थापकाची ही कहाणी सर्वांनासाठी प्रेरणादायी आहे.

Success Story: उपासमारीने झाडाची साल खावी लागली, तरीही बनवला जगातला सर्वात मोठा कार ब्रँड
Chung Ju-Yung
| Updated on: Sep 26, 2025 | 8:22 PM

दक्षिण कोरियाची ऑटो कार कंपनी हुंडई (Hyundai) नाव आज जगात सर्वत्र आहे. आज हा कारचा ब्रँड जगातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल साम्राज्यापैकी एक आहे. या ब्रँडची कार जगातील कोट्यवधींची पसंद बनलेली आहेत.मात्र हा कार ब्रँड तयार करण्यामागे प्रचंड मोठा संघर्ष,मेहनत आणि जिद्दीची कहाणी आहे. जी तुम्हाला प्रेरणा देईल की परिस्थिती कितीही बिकट असेल तर न डगमगता मेहनत केल्याने आपले स्वप्न कसे पूर्ण होऊ शकते.

ही कहाणी आहे हुंडईचे फाऊंडर चुंग- जू-युंग (Chung Ju-Yung) यांची आहे , ही कहाणी अशा व्यक्तीची आहे. जिला एकेवेळी जेवण मिळणेही दुरापास्त होते. त्यांना झाडाची साल खाऊन दिवस काढावे लागले. याच हालाखीच्या स्थितीतून बाहेर येत चुंग- जू-युंग जगातला सर्वात मोठा कार बँड जन्माला घातला आहे.

भूकेशी संघर्ष करत सुरु झाला प्रवास

कोरियाच्या एका गरीब कुटुंबात २५ नोव्हेंबर १९१५ मध्ये जन्मलेल्या चूंग जू-युंग यांचे जीवन संघर्षाने भरलेले आहे. कधी त्यांना पोटभर अन्न मिळणेही कठीण होते. उपाशी राहिल्याने झाडाची साल खाण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. तरीही चुंग जू-युंग यांनी हार मानली नाही.परंतू त्यांनी निर्धार केला की गरीबी त्यांच्या मार्गातील अडसर बनणार नाही.

Hyundai ची पायाभरणी

अभ्यास आणि मेहनत करत असतानाच चुंग जू-युंग यांनी छोटी-मोठी कामे कुटुंबाला हातभार लावण्यासाठी केली. परंतू त्यांचे स्वप्न मोठे होते. साल १९७४ मध्ये त्यांनी एक छोटी बिल्डींग कंपनीची सुरुवात केली. सुरुवातीचा संघर्ष आणि साधनांच्या अभावी देखील त्यांनी हार मानली नाही. त्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान शिकण्यासाठी जपान आणि अमेरिकेचा प्रवास केला. कंपनीला नव्या शिखरावर आणण्याची योजना आखली. १९६७ मध्ये त्यांनी हुंडई निर्मिती उद्योगांची पायाभरणी केली आणि १९७६ मध्ये हुंडई मोटर्सची स्थापना केली. हळूहळू ही कंपनी दक्षिण कोरियाच्या सीमेपार जाऊन जगातील एक प्रमुख कार कंपनी म्हणून नावारुपाला आली.

चुंग जू-युंग यांनी सिद्ध केले की मेहनत, साहस आणि दुरदृष्टीने कोणतीही व्यक्ती अशक्य ते शक्य करु शकतो. त्यांचे निधन साल २००१ मध्ये झाले. परंतू त्यांचे जीवन आणि त्यांची कंपनी लाखो लोकांसाठी प्रेरणा देणारे केंद्र बनले आहे.