शेअर बाजारात पडझड सुरूच; सलग तिसऱ्या दिवशी सेन्सेक्स, निफ्टीमध्ये घसरण, गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले

शेअर मार्केटमध्ये सातत्याने पडझड सुरूच आहे. आज देखील सेन्सेक्स 153.25 अंकांनी घसरला असून, निफ्टी 16 हजारांच्या खाली गेला आहे.

शेअर बाजारात पडझड सुरूच; सलग तिसऱ्या दिवशी सेन्सेक्स, निफ्टीमध्ये घसरण, गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 11:10 AM

Stock Market Update : भारतीय शेअर बाजारात (Share Market) पडझड सुरूच आहे. चालू आठवड्यात आज सलग तिसऱ्या दिवशी सेन्सेक्स (BSE Sensex) आणि निफ्टीमध्ये घसरण पहायला मिळत आहे. शेअर मार्केटवर गेल्या काही आठवड्यापासून विक्रीचा दबाव दिसून येत आहे. आज शेअर मार्केट सुरू होताच सेन्सेक्स 153.25 अंकांनी घसरून, 52,540.32 अंकांवर पोहोचला. तर निफ्टीमध्ये (NSE Nifty) देखील 39.55 अंकांची घसरण झाली असून, निफ्टी 15,692.55 अकांवर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये सातत्याने घसरण सुरू असल्याने गुंतवणूकदारांना याचा मोठा फटका बसला आहे. आतापर्यंत गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले आहेत. रिलायन्सच्या शेअरवर विक्रीचा दबाव वाढल्याने शेअरमधील घसरण सुरूच आहे. तसेच भारतीय शेअर मार्केटमधील विदेशी गुंतवणूक देखील झपाट्याने कमी होत आहे.

हे सुद्धा वाचा

पहिल्याच सत्रात घसरण

मंगळवारी सेन्सेक्समध्ये 153.13 अंकांची घसर झाली होती. तर निफ्टी 42.30 अंकांच्या घसरणीसह बंद झाला होता. आज शेअर मार्केट किंचित तेजीसह ओपन झाले. मात्र कारभार सुरू होताच पहिल्याच सत्रामध्ये पुन्हा एकदा सेन्सेक्स 153.25 अकांनी तर निफ्टी 39.55 अंकांनी घसरला. आज सलग तिसऱ्या दिवशी शेअर मार्केटमध्ये घसरण होत असल्याने गुंतवणुकदारांची धाकधूक वाढली आहे. चालू आठवड्यासह गेल्या आठवड्यात देखील शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण झाली होती. भारतातीलच नाही तर सध्या जागतिक बाजारात सुद्ध पडझड पहायला मिळत आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.

चालू आठवड्यात मोठी पडझड

चालू आठवड्यात पहिले तीन दिवस शेअर मार्केटमध्ये घसरण सुरूच आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सेन्सेक्समध्ये मोठी घसरण पहायला मिळाली होती. सोमवारी सेन्सक्स तब्बल 1,456.74 अंकांच्या घसरणीसह बंद झाला. तर निफ्टी 427.40 अंकांच्या घसरणीसह बंद झाला. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सेन्सेक्समध्ये 153.13 अंकांची तर निफ्टीमध्ये 42.30 अंकांची घसरण झाली. बुधवारी देखील घसरणीचे सत्र सुरूच राहिले, आज शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स 153.25 अंकांनी घसरून 52,540.32 च्या पातळीवर पोहोचला आहे. तर निफ्टीमध्ये 39.55 अंकांची घसरण झाली असून, निफ्टी देखील 16 हजारांच्या खाली आला आहे.

Non Stop LIVE Update
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.