Stock market updates : सुरुवातीच्या घसरणीनंतर शेअर बाजारात किंचित तेजी, सेन्सेक्समध्ये 200 अंकांची वाढ

| Updated on: May 10, 2022 | 11:43 AM

आज देखील शेअर बाजार पडझडीसह सुरू झाला, शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्समध्ये घसरण झाल्याचे पहायला मिळाले. मात्र त्यानंतर या पडझडीतून शेअर बाजार सावरला असून, सेन्सक्समध्ये तेजी दिसून येत आहे.

Stock market updates : सुरुवातीच्या घसरणीनंतर शेअर बाजारात किंचित तेजी, सेन्सेक्समध्ये 200 अंकांची वाढ
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : आज शेअर बाजार (Stock market) सुरू होताच शेअर बाजारात घसरण पहायला मिळत होती. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी शेअ बाजार सुरू होताच सेन्सेक्स (Sensex) आठशे अंकांनी कोसळला होता. आज देखील शेअर बाजार सुरू होताच पहिल्याच सत्रात सेन्सेक्समध्ये 0.30 टक्क्यांची म्हणजेच 161 अंकांची घसरण झाली. 161 अकांच्या घसरणीसह सेन्सेक्स 54309 अकांवर पोहोचला. तर दुसरीकडे निफ्टीमध्ये (Nifty) देखील 0.33 अकांची घसरण झाली असून, निफ्टी 53 अंकांनी कमी होऊन 16248 अंकांवर पोहोचली होती. मात्र आता परिस्थितीमध्ये सुधारणा होत असून, सेन्सेक्समध्ये तेजी आल्याचे पहायला मिळत आहे. घसरणीसह सुरू झालेल्या सेन्सेक्सने 200 अकांची उसळी घेतली आहे. सेन्सेक्स वाढीसह 54,550 अंकांवर पोहोचला आहे. तर निफ्टी देखील 15 अंकांनी वधारली आहे. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरू असल्याने गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. गुंतवणूकदारांचे तब्बल 7.73 कोटी रुपये बुडाले आहेत.

रिलायन्सच्या शेअर्सवर विक्रीचा दबाव

रिलायन्सच्या शेअर्समध्ये आज सलग सातव्या दिवशी घसरण दिसून येत आहे. आज सकाळी सव्वादहापर्यंत रिलायन्सचा शेअर 1.53 टक्क्यांनी घसरून 2479 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या आठवड्याभरात रिलायन्सच्या शेअरमध्ये तब्बल 11 टक्क्यांची घसरण पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे आज रुपयामध्ये किंचित सुधारणा दिसत असून, डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयात 18 पैशांची सुधारणा झाली असून, रुपया प्रति डॉलर 77.47 रुपयांवर पोहोचला आहे.

गुंतवणूकदारांना कोट्यावधीचा फटका

गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारातच नव्हे तर जागतिक शेअर बाजारावर विक्रीचा दबाव वाढत आहे. गुंतवणूकदार आपली गुंतवणूक शेअर मार्केटमधून कमी करताना दिसत आहेत. त्यामुळे शेअर मार्केटवर विक्रीचा दबाव वाढला आहे. याचा सर्वाधिक फटका हा भारतीय शेअरबाजाराला बसला आहे. गेल्या शुक्रवारी सेन्सेक्स तब्बल आठशे अकांनी कोसळला होता. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी घसरणीचे सत्र कायम राहिले शेअर बाजार 364 अकांच्या घसरणीसह बंद झाला होता. तर आज देखील सुरुवातीच्या सत्रात शेअर बाजारात घसरण दिसून येत होती. मात्र आता सध्या सेन्सेक्समध्ये तेजी दिसून येत आहे.