
भारतीय रेल्वेमध्ये प्रवास करण्यासाठी तिकीट काढावे लागते आणि त्याची प्रक्रिया देखील खूप सोपी आहे. पण काही वेळा काही कारणाने तिकीट रद्द करावे लागते. बहुतेक लोकांना तिकीट बुक करण्याच्या प्रक्रियेची माहिती असली तरी पण खूप कमी लोक आहेत, ज्यांना तिकीट रद्द केल्याची माहिती असते. तसेच या काळात किती शुल्क कापले जाते हेसुद्धा जाणून घेणे अधिक महत्त्वाचे होते. तुम्हालाही कोणत्याही कारणाने केव्हाही तिकीट रद्द करावे लागले, तर या महत्त्वाच्या गोष्टींची विशेष काळजी घ्या.


ट्रेन सुटण्याच्या 48 तास आधी तुम्ही तिकीट रद्द केल्यास प्रति प्रवाशाकडून शुल्क आकारले जाते. एसी फर्स्ट क्लास किंवा एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी प्रति प्रवासी 240 रुपये आकारले जातील. पण दुसरीकडे जर ते एसी टू-टायर किंवा फर्स्ट क्लासचे तिकीट असेल, तर त्यात 200 रुपये कापले जातील. एसी थ्री-टियर तिकिटांवर 180 रुपये कापले जातील आणि तेवढीच रक्कम AC चेअर कार किंवा AC 3 इकॉनॉमी क्लाससाठी आकारली जाते. प्रवाशाने स्लीपर क्लासचे तिकीट रद्द केल्यास 120 रुपये कापले जातील आणि द्वितीय श्रेणीचे 60 रुपये कापले जातील.

