Tata Salt Price Hike | चवीचे मीठ ही महागाईला जागले! टाटा कंपनीची दरवाढीची घोषणा, पुन्हा सर्वसामान्यांच्या खिश्यात हात

| Updated on: Aug 12, 2022 | 10:56 AM

Tata Salt Price Hike | आळणी जेवणाला चव आणणारे किचनमधील मीठ ही आता महागणार आहे. देशातील सर्वात मोठी मीठ उत्पादक कंपनी टाटा कन्झ्युमरने याविषयीची घोषणा केली आहे. सध्या एक किलोचे पॅकेट 28 रुपयांना बाजारात मिळते. किंमत किती वाढवणार याची माहिती कंपनीने दिली नाही.

Tata Salt Price Hike | चवीचे मीठ ही महागाईला जागले! टाटा कंपनीची दरवाढीची घोषणा, पुन्हा सर्वसामान्यांच्या खिश्यात हात
मीठा ही महागाईला जागले
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

Tata Salt Price Hike : आळणी जेवणाला चव आणणारे किचनमधील मीठ (Salt) ही आता महागणार आहे. देशातील सर्वात मोठी मीठ उत्पादक कंपनी टाटा कन्झ्युमरने (Tata Consumer) याविषयीची घोषणा केली आहे. सध्या एक किलोचे पॅकेट 28 रुपयांना बाजारात मिळते. किंमत किती वाढवणार याची माहिती कंपनीने दिली नाही. अगोदरच महागाईने (Inflation) बेचव झालेल्या जेवणाला आता मीठाची गोडी ही लागणार नसल्याचे या निर्णयामुळे स्पष्ट झाले आहे. वाढता खर्च भरून काढण्यासाठी नाईलाजाने किंमत वाढवण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे कंपनीने म्हटरले आहे. प्रत्येकाच्या घरात मीठ रुचकर जेवणासाठी महत्वाची भूमिका बजावते. पण मीठ ही महागाईला जागल्यामुळे आता सर्वसामान्यांच्या तोंडाची चव ही महागाई घालवणार असेच दिसते. मीठापासून रोजच्या जेवणातील अत्यावश्यक सगळ्याच गोष्टी महाग होत असल्याने सरकारच्या (Government) भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

काय आहे कंपनीचा दावा

टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्सचे एमडी (MD)आणि सीईओ (CEO) सुनील डिसोझा यांनी एका मुलाखतीदरम्यान टाटा सॉल्टच्या किंमतीत वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. मीठ उत्पादनासाठी कंपनीला महागाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बाजारातील किंमत आणि उत्पादन खर्च यांचा ताळमेळ बसवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मार्जीन मिळवण्यासाठी मीठाच्या किंमतीत वाढ करण्याची तयारी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. वीजेच्या किंमतीमुळे उत्पादन खर्चात वाढ झाल्याचा दावा त्यांनी केला.

हे सुद्धा वाचा

ऊर्जेवरचा खर्च वाढला.

मीठाच्या किंमती या ब्रिन आणि ऊर्जा या प्रमुख दोन घटकांवर अवलंबून असतात. ब्रिनच्या किंमती सध्या स्थिर आहेत. मात्र ऊर्जेचा खर्च सध्या अवाक्याबाहेर गेला आहे, असे डिसूझा यांनी सांगितले. त्याच्यामुळे कंपनीचे नफ्याचे गणित बिघडले आहे. त्याचा थेट परिणाम आता किंमतींवर होणार आहे. उत्पादन खर्च वाढण्यामागे ऊर्जेवरील खर्च हा प्रमुख घटक असल्याचे डिसूझा यांनी या मुलाखतीदरम्यान सांगितले. त्यामुळे दरवाढ अटळ असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

किचन बजेटवर ताण

रोजच्या जेवणाला मीठाशिवाय चव येत नाही. अनेक मोठ्या घरांमध्ये मीठाचे अनेक पुडे लागतात. तर हॉटेल, रेस्टॉरंट एवढंच काय दारुच्या दुकानातही मीठाचा खप अधिक आहे. या सर्वांना मीठ दरवाढीचा फटका बसणार आहे. मिठाच्या किमती किती आणि कधीपर्यंत वाढतील, याचा खुलासा टाटा कन्झ्युमरने केलेला नाही. सध्या बाजारात टाटा सॉल्टचं एक किलोचं पॅकेट 28 रुपयांना मिळतं. टाटा नमक, हे देशात सर्वाधिक विक्री होणारे मीठ आहे, ते वाढल्याने ग्राहकांच्या खिश्यावर परिणाम होईल आणि किचन बजेटवर ताण पडणार आहे.

कंपनीला 38 टक्के नफा

बुधवारी टाटा कन्झ्युमरने पहिल्या तिमाहीचे निकाल (Tata Consumer Q1 Result)जाहीर केले आहेत. जूनच्या तिमाहीत कंपनीचा नफा वर्षाभरात 38 टक्क्यांनी वाढून 255 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. असे असले तरीही कंपनीने वाढत्या खर्चाला आळा घालण्यासाठी आणि नफ्याचे सूत्र कायम ठेवण्यासाठी मीठाच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.