Business Idea Viral Post: ऑफिसला ये-जा करताना महिन्याला 78 हजार कमाई; TCS कर्मचाऱ्याचा फंडा ऐकून व्हाल थक्क

टीसीएसमध्ये काम करणारा एक कर्मचारी जो त्याच्या बिल्डिंगमध्ये राहतो, त्याचे ऑफिस घरापासून 30 KM दूर आहे, तो घरापासून ऑफिसला पोहोचेपर्यंत पगारापेक्षा जास्त कमाई करतोय. नेमकी काय आहे त्याची बिझनेस आयडिया? वाचा...

Business Idea Viral Post: ऑफिसला ये-जा करताना महिन्याला 78 हजार कमाई; TCS कर्मचाऱ्याचा फंडा ऐकून व्हाल थक्क
| Updated on: Nov 13, 2026 | 9:00 PM

TCS Employee Business Idea Viral Post:  आपल्या घरापासून ऑफिस जवळं असावं असं प्रत्येकाला वाटते. घर आणि ऑफिसमधील अंतर जास्त असेल तर प्रवासाचा त्रास होतो. मात्र एखादा कॉर्पोरेट ऑफिसमधील कर्मचारी घरातून निघाल्यानंतर ऑफिसला पोहोचेपर्यंत त्याच्या पगारापेक्षा जास्त पैसे कमवतोय असं कुणी सांगितलं तर विश्वास बसेल का? असाच अविश्वसनीय दावा अंकित पांडे नावाच्या व्यक्तीने केला आहे. त्याच्या दाव्यानुसार, टीसीएसमध्ये काम करणारा एक कर्मचारी जो त्याच्या बिल्डिंगमध्ये राहतो, त्याचे ऑफिस घरापासून 30 KM दूर आहे, तो घरापासून ऑफिसला पोहोचेपर्यंत पगारापेक्षा जास्त कमाई करतोय. नेमकी काय आहे त्याची बिझनेस आयडिया? वाचा…

घरापासून ऑफिसला जाईपर्यंत 78,000 ची कमाई! 

Loading...

अंकितने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “माझा शेजारी ऑफिसला येण्या-जाण्यासाठी त्याच्या खाजगी गाडीचा वापर करायचा. पण एके दिवशी त्याने ती वापरणे बंद केले आणि एक नवीन व्यावसायिक डिझायर गाडी विकत घेतली. त्याने ती उबर आणि रॅपिडोशी जोडली. तेव्हापासून तो सकाळी ५ वाजता घरातून निघतो, वाटेत प्रवासी घेतो, त्याच्या टीसीएस ऑफिसला जातो आणि मग परत येतो. एकूण, तो त्याच्या नोकरीव्यतिरिक्त 5 तास गाडी चालवतो. त्याचा दावा आहे की तो दररोज 3000 चा निव्वळ नफा कमावतो.”

नेटकरी चक्रावले, उलट-सुलट प्रतिक्रिया! 

त्याच्या या दाव्यावरुन नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा रंगल्या असून अनेकांनी त्यावर उलट-सुलट प्रतिक्रिया दिल्यात. कल्पना चांगली आहे, पण खरा प्रश्न हा आहे की, 78,000 साठी तुमचा वेळ, इंधन, देखभाल आणि झोप यांचा त्याग करणे योग्य आहे का?” असा सवाल केला आहे. तर आणखी एका युजरने हा दावाच खोटा असल्याचं म्हटलं आहे.

“जरी सामान्य टॅक्सी ड्रायव्हरने दिवसातून १२ तास काम केले तरी ते तुम्ही सांगितल्याप्रमाणे इतके कमवू शकत नाहीत. तुम्ही जे सांगत आहात ते खरे आहे असे मला वाटत नाही. ही निव्वळ एक बनावट गोष्ट आहे, असं म्हणत त्याने हा दावाच खोडून काढला आहे. तर आणखी एका युजरने तुमच्या रोजच्या प्रवासाला अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत बनवण्याचा हा एक हुशार मार्ग आहे, विशेषतः जेव्हा तुमची गाडी सहसा उभीच असते. हे उत्तम आहे, असं म्हणत याचे कौतुकही केले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us