मुंबईपासून ‘या’ 4 शहरांमध्ये सेवा देणार खासगी Tejas Express, जाणून घ्या वेळापत्र

| Updated on: Feb 14, 2021 | 3:11 PM

ही ट्रेन आठवड्यातून चार दिवस - शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवारी सेवा देणार आहे.

मुंबईपासून या 4 शहरांमध्ये सेवा देणार खासगी Tejas Express, जाणून घ्या वेळापत्र
तेजस एक्स्प्रेस
Follow us on

Tejas Express started : अखेर अनेक दिवसांनी देशातली पहिली खासगी ट्रेन तेजस एक्स्प्रेसची सेवा आधीप्रमाणे सुरू झाली आहे. याआधी नोव्हेंबर महिन्यामध्ये ही सेवा सुरू करण्यात आली होती पण व्यापारी कमी असल्यामुळे सेवा थांबवण्यात आली होती. पण अखेर ट्रेन्स पुन्हा सुरू झाल्या आहेत. (tejas express service mumbai ahmedabad delhi lucknow book through irctc ipay)

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेजस एक्सप्रेस दिल्ली-लखनऊ आणि मुंबई-अहमदाबाद या दरम्यान चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 82901/82902 हा ट्रेन नंबर मुंबई सेंट्रल आणि अहमदाबाद दरम्यान धावेल. तर Train No. 82901 – मुंबईहुन ही ट्रेन दुपारी 3.50 वाजता निघेन. ती त्याच दिवशी रात्री 10.05 वाजता अहमदाबादला पोहोचेल. Train No 82902 – ही ट्रेन अहमदाबादहून सकाळी 6.40 ला सुटेल आणि दुपारी 1.05 वाजता मुंबईत पोहोचेल.

ही ट्रेन आठवड्यातून चार दिवस – शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवारी सेवा देणार आहे. सध्या यात एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह एसी चेअर कार कोट देण्यात आले आहेत. .

लखनऊ-नवी दिल्ली-लखनऊ तेजसच्या वेळा

लखनऊ आणि नवी दिल्ली दरम्यान धावणाऱ्या रेल्वेचा नंबर (82501/82502) हा आहे. गाड़ी संख्या 82502 नवी दिल्लीहून लखनऊकडे जाईल. नवी दिल्लीहून ती दुपारी 3.40 वाजता निघेन आणि रात्री 10.05 वाजता लखनऊला पोहोचेल. गाड़ी संख्या 82501 लखनऊहून दिल्लीसाठी येईल. ती सकाळी 6.10 ला लखनऊवरून रवाना होईल आणि दुपारी 12.25 वाजता दिल्लीला पोहोचेल.

IRCTC-iPay ने भरा पैसे, रिफंड मिळवणंही सोपं

अगदी सोप्या आणि सहज पद्धतीने तिकीट बुकिंग करण्यासाठी चांगला पर्याय म्हणजे आयआरसीटीसीने सुरु केलेलं नवीन पेमेंट गेटवे IRCTC-iPay. या मदतीने, तुम्ही सोप्या पद्धतीने तिकीट काढून हवं तेव्हा सहज रिफंड मिळवू शकता. वापरकर्त्यांना त्यांचे यूपीआय बँक खाते डेबिट कार्ड किंवा इतर कोणत्याही पेमेंट फॉर्म वापरण्यासाठी परवानगी आणि तपशील द्यावा लागतो. (tejas express service mumbai ahmedabad delhi lucknow book through irctc ipay)

संबंधित बातम्या –

Petrol at 100: ऐन महागाईत पेट्रोलचंही शतक, 3 अंकी किंमतीमुळे पंप पडले बंद

तुम्ही या बँकेचे ग्राहक असाल तर लक्ष द्या, 1 मार्चपासून बँकेत होणार आहे मोठा बदल

SBI, HDFC बँक, ICICI आणि BOB ची स्पेशल FD ऑफर, जाणून घ्या डिटेल्स

Petrol Diesel Price: आठवड्याच्या शेवटीही पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, इथे वाचा ताजे दर

(tejas express service mumbai ahmedabad delhi lucknow book through irctc ipay)