SBI, HDFC बँक, ICICI आणि BOB ची स्पेशल FD ऑफर, जाणून घ्या डिटेल्स

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकांमध्ये खास योजना राबवल्या जात आहेत. ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक वयाच्या शेवटच्या टप्प्यात असताना त्यांना कोणताही त्रास न घेता त्यांच्या आर्थिक गरजा भागवता येतील.

SBI, HDFC बँक, ICICI आणि BOB ची स्पेशल FD ऑफर, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्ली : Senior citizens Special FD Scheme : कोरोनाचा जीवघेणा काळ पाहिल्यानंतर आता गुंतवणुकीसाठी बँकेत मुदत ठेव हा सगळ्यात सोपा आणि सुरक्षित पर्याय दिसतो. यामध्ये गुंतवणूकदारास ठराविक कालावधीत निश्चित उत्पन्न मिळतं तसेच बाजारातील चढ-उतारांचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकांमध्ये खास योजना राबवल्या जात आहेत. ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक वयाच्या शेवटच्या टप्प्यात असताना त्यांना कोणताही त्रास न घेता त्यांच्या आर्थिक गरजा भागवता येतील. (fixed deposit scheme for senior citizens special sbi icici bob hdfc bank fd interest rates )

ही खास ऑफिर 31 मार्च 2021 पर्यंतच आहे

तुम्हाला तुम्ही केलेल्या बचतीवर अधिक व्याज मिळवायचं असेल तर फिक्स्ड डिपॉझिट (€ एफडी) योजनांमध्ये गुंतवणूक म्हणजे उत्तम पर्याय आहे. यासाठी भारतीय स्टेट बँक (SBI), एचडीएफसी बँक (HDFC BANK), आयसीआयसीआय बँक (ICICI BANK) आणि बँक ऑफ बडोदा (BOB) यासारख्या प्रमुख बँकांनी या गुंतवणुकीच्या योजना सुरू केल्या आहेता. ही विशेष एफडी योजना ज्येष्ठ नागरिकांना 31 मार्च 2021 पर्यंत उपलब्ध आहे.

BOB ची खास एफडी योजना –

ज्येष्ठ नागरिकांना BOB बँक ठेवींवर 100 बीपीएस जास्त व्याज दर देत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एफडी योजनेत (5 वर्ष ते 10 वर्षे) जर वरिष्ठ नागरिक बीओबी बँकेच्या सीनियर सिटीझन केअर एफडी मध्ये गुंतवणकूत करतात तर त्यांना एफडीचा व्याज दर 6.25 टक्के असणार आहे.

ICICI बँक विशेष एफडी योजना –

ICICI बँक ज्येष्ठ नागरिकांना ठेवींवर 80 बीपीएस जास्त व्याज दर देणार आहे. यामध्ये बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी गोल्डन ईयर एफडी अशी विशेष योजना सुरू केली आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकाला 6.30 टक्के व्याज दिलं जातं.

HDFC बँक विशेष एफडी योजना –

ज्येष्ठ नागरिकांना ठेवींवर 75 बीपीएस जास्त व्याज दर देते. एचडीएफसी बँकेच्या सीनियर सिटीझन केअर एफडी योजनेमध्ये जर ज्येष्ठ नागरिकाने निश्चित ठेव केली तर एफडीला लागू असलेला व्याज दर 6.२5 टक्क्यांपर्यंत मिळेल.

SBI विशेष एफडी योजना –

देशातील सगळ्यात मोठी सरकारी बँक SBI आहे. एसबीआय ठेव रकमेवर ज्येष्ठ नागरिकांना 80 बीपीएस जास्त व्याज दर देते. सध्या एसबीआय ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर 6.20% व्याज देत आहे. एसबीआय सध्या सामान्य लोकांना 5.4 टक्के व्याज देत असून अशा परिस्थितीत तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर एसबीआयमध्ये निश्चित ठेव ठेवू शकता. (fixed deposit scheme for senior citizens special sbi icici bob hdfc bank fd interest rates )

संबंधित बातम्या – 

Petrol Diesel Price: आठवड्याच्या शेवटीही पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, इथे वाचा ताजे दर

पीएनबीकडून 2370 बँकांचे IFSC आणि MICR कोड जारी, ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी लिस्ट पहा

या मोबाईल अ‍ॅपद्वारे Post Office मध्ये उघडा खातं, घर बसल्या होईल काम

अन्यथा Deactivate होईल तुमचं पॅन कार्ड, आयकर विभागाने दिली महत्त्वाची माहिती

(fixed deposit scheme for senior citizens special sbi icici bob hdfc bank fd interest rates )

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI