अन्यथा Deactivate होईल तुमचं पॅन कार्ड, आयकर विभागाने दिली महत्त्वाची माहिती

पॅनकार्ड आणि आधारविषयी नवीन माहिती समोर आली आहे. पॅन नंबरला आधार क्रमांकाशी जोडण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2021 आहे.

अन्यथा Deactivate होईल तुमचं पॅन कार्ड, आयकर विभागाने दिली महत्त्वाची माहिती
aadhaar card pan card

मुंबई : आधार आणि कायमस्वरुपी खाते क्रमांक अर्थात पॅनकार्ड सध्या सगळ्यात महत्त्वाच्या कागदपत्रापैकी एक आहे. याशिवाय तुम्ही बँक खातंही उघडू शकत नाही ना कुठलीही महत्त्वाची कामं करू शकत. अशात पॅनकार्ड आणि आधारविषयी नवीन माहिती समोर आली आहे. पॅन नंबरला आधार क्रमांकाशी जोडण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2021 आहे. तुम्ही अद्याप तुमचा पॅन आधारशी लिंक केलेला नसेल तर आधी हे काम करा. अन्यथा 31 मार्चनंतर, ज्यांना पॅन आधारशी जोडलं जाणार नाही त्यांचे पॅनकार्ड 1 एप्रिल 2021 पासून डिअॅक्टिव्हेट केलं जाईल. (aadhaar card pan card link how to link aadhar card with pan card how i can check pan aadhar card status)

एकदा का जर तुमचं पॅनकार्ड बंद झालं तर ते पुन्हा सुरू करण्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल. हल्ली इनकम टॅक्स रिटर्न (आयटीआर) दाखल करण्यासाठी, पॅन कार्जसह आधार क्रमांक देणंसुद्धा आवश्यक असणार आहे. याची शेवटची तारीख 30 जून 2020 होती, जी 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे तातडीने हे काम करून घ्या.

पॅनकार्ड होऊ शकतं बाद किंवा आकारला जाऊ शकतो दंड

पॅनकार्ड आधारशी लिंक न केल्यास ते बाद ठरते. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्च 2021 नंतर कोणतेही बाद झालेले पॅनकार्ड जर तुम्ही वापरले तर प्राप्तिकर कलम 272 बी अंतर्गत 10,000 रुपये दंड आकारला जातो. त्यामुळे जर करदात्यांनी 31 मार्चपर्यंत पॅन आणि आधार कार्ड लिंक केलं नाही तर पॅनकार्ड बाद होऊ शकतं.

पॅनकार्ड रद्द झालं तर काय अडचणी येतील?

जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल, पण ते आधारशी लिंक नसेल तर ते अवैध ठरवले जाईल आणि त्याचा काही उपयोग होणार नाही. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची आधार योजना घटनात्मक वैध म्हणून घोषित केली होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैध पॅन कार्डशिवाय रिटर्न भरणंदेखील शक्य नाही.

पॅनकार्ड कसे जोडाल आधार कार्डशी?

– आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट incometaxindiaefiling.gov.in वर लॉगइन करा.

– इथे तुम्हाला आधार लिंक करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

– त्यानंतर तुमचा पॅन नंबर, आधार क्रमांक, तुमचे नाव खाली असलेल्या बॉक्समध्ये भरा.

– यानंतर कॅप्चा कोड काळजीपूर्वक पाहा आणि बॉक्समध्ये भरा.

– सर्व माहिती भरल्यानंतर आधारशी लिंक अशा पर्यायावर क्लिक करा. (aadhaar card pan card link how to link aadhar card with pan card how i can check pan aadhar card status)

संबंधित माहिती – 

मनात आणलं तर या व्यवसायात लाखापर्यंत कमवाल, खूप फायद्याची आहे बिझनेस आयडिया

घरात पडून असलेल्या सोन्यातून लाखो कमाव, काय आहे SBI ची खास Gold Scheme ?

आनंदाची बातमी! सरकारने वाढवली कौटुंबिक पेन्शनची मर्यादा, 45 हजार रुपयांवरून आता दरमहा….

Petrol Diesel Price : आज पेट्रोल स्वस्त की महागलं? वाचा तुमच्या शहरातले भाव

(aadhaar card pan card link how to link aadhar card with pan card how i can check pan aadhar card status)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI