आनंदाची बातमी! सरकारने वाढवली कौटुंबिक पेन्शनची मर्यादा, 45 हजार रुपयांवरून आता दरमहा….

केंद्रीय मंत्र्यांनी महत्त्वाच्या सुधारणांतर्गत कुटुंब पेन्शनची मर्यादा 45 हजार रुपयांवरून दरमहा 1.25 लाख रुपये केली आहे.

आनंदाची बातमी! सरकारने वाढवली कौटुंबिक पेन्शनची मर्यादा, 45 हजार रुपयांवरून आता दरमहा....
पेन्शन फंड
Follow us
| Updated on: Feb 13, 2021 | 10:10 AM

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह (Union Minister Jitendra Singh) यांनी शुक्रवारी कौटुंबिक पेन्शन (Family Pensions) अडीच पटहून अधिक वाढवलं आहे. केंद्रीय मंत्र्यांनी महत्त्वाच्या सुधारणांतर्गत कुटुंब पेन्शनची मर्यादा 45 हजार रुपयांवरून दरमहा 1.25 लाख रुपये केली आहे. यामुळे मृत कर्मचार्‍यांच्या कुटुंबातील लोकांचं जीवनमान सोपं होईल आणि त्यांना पुरेशी आर्थिक सुरक्षा मिळेल, असा यामागे हेतू आहे. (family pension limit increased upto 125000 per month here is the details)

मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवृत्ती वेतन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने (DOPPW) मुलाचा किंवा त्याच्या पालकांचा मृत्यू झाल्यास कुटुंब पेंशनचे दोन हप्ते मागे घेण्यास पात्र असलेल्या रकमेबाबत स्पष्टीकरण जारी केलं आहे. त्यामध्ये यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. यामुळे कठीण काळात कुटुंबाला याची मदत होणार आहे.

अडीच पट वाढ

याआधीही ही रक्कम 45 हजार रुपयांपर्यंत होती. ज्यामध्ये आता अडीच पटीनं वाढ करण्यात आली असून याची रक्कम 1.25 लाख रुपयांपर्यंत नेण्यात आली आहे. असं स्पष्टीकरण अनेक मंत्रालयं आणि विभागांकडून प्राप्त झालेल्या संदर्भांच्या आधारे देण्यात आलं आहे.

दोन मुलांना मिळणार पेन्शन

मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, केंद्रीय नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम 1972च्या नियम 54 च्या पोट-नियम (11) नुसार पती-पत्नी दोघेही सरकारी कर्मचारी असतील तर त्यांना हे नियम लागू होणार आहेत. पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या दोन मुलाला कौटुंबिक पेन्शनचा लाभ घेता येणार आहे.

दरम्यान, देशातील 21,19,316 शेतकर्‍यांचा वृद्धापकाळ मोदी सरकारनं सुरक्षित केलं आहे. त्यामुळेच अनेक शेतकऱ्यांनी (farmers pension scheme) पेन्शन योजनेत नोंदणी केली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Scheme) लाभार्थ्यांना या निवृत्तीवेतनाचा लाभ घेणे फायदेशीर ठरणार आहे. कारण त्यांच्यासाठी ते विनामूल्य आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या खिशातून या योजनेचा प्रीमियम कापला जाणार नाही. त्याऐवजी सरकारकडून वार्षिक स्वरूपात देण्यात येणाऱ्या 6000 रुपयांतून ते पैसे वजा केले जातील. फक्त यासाठी शेतकऱ्याला तसा पर्याय निवडावा लागेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 सप्टेंबर 2019 रोजी झारखंडमधून ही योजना सुरू केली होती. परंतु त्याअंतर्गत 9 ऑगस्टपासूनच नोंदणीला सुरुवात झाली होती. प्रधानमंत्री किसान मानधन योजना (Pradhan Mantri Kisan Maan Dhan Yojana) असे त्या योजनेचे नाव आहे. शेतकर्‍यांना समर्पित असलेली सर्वात मोठी पेन्शन योजना आहे. यात सामील झालेल्या शेतकऱ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यावर महिन्याला 3000 रुपये पेन्शन मिळते. (family pension limit increased upto 125000 per month here is the details)

संबंधित बातम्या – 

नोकरी बदलण्यात महिन्याचे अंतर असल्यास मोठा फटका, काय आहे संपूर्ण प्रकरण?

India’s first CNG Tractor: आता जुन्या ट्रॅक्टरमध्ये CNG किट बसवता येणार, नितीन गडकरींची मोठी घोषणा

Petrol Diesel Price : आज पेट्रोल स्वस्त की महागलं? वाचा तुमच्या शहरातले भाव

(family pension limit increased upto 125000 per month here is the details)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.