क्रिप्टोकरन्सीने उजळले तीन भारतीय तरुणांचे नशिब; अल्पावधीत बनले अब्जाधीश

| Updated on: May 31, 2021 | 9:10 PM

काही वर्षांपूर्वी पॉलीगॉन लॉन्च करणारे जयंती कनानी, संदीप नैलवाल आणि अनुराग अर्जुन यांनी आता अब्जाधीशांच्या यादीत स्थान पटकावले आहे. (The fate of three young Indians illuminated by cryptocurrency; Became a billionaire in a short time)

क्रिप्टोकरन्सीने उजळले तीन भारतीय तरुणांचे नशिब; अल्पावधीत बनले अब्जाधीश
क्रिप्टोकरन्सीने उजळले तीन भारतीय तरुणांचे नशिब
Follow us on

नवी दिल्ली : गेल्या वर्षीपासून कोरोना महामारीने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. यंदा सलग दुसऱ्या वर्षी कोरोना विषाणूची दहशत कायम आहे. एकीकडे सरकार या महामारीविरोधात लढण्यासाठी नवनवे उपाय शोधत आहे, लसींची उपलब्धता वाढवत आहे. अशातच सामान्य लोकांना मात्र रोजीरोटीचा प्रश्न दूर करावा लागत आहे. आजच्या घडीला देशात विषाणू दररोज साडेतीन-चार हजारांवर लोकांचे बळी घेत आहे. एकीकडे हे चिंतेचे वातावरण असले तरी दुसरीकडे काही लोकांनी क्रिप्टोकरन्सी मार्केटवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. 2021 च्या सुरुवातीपासूनच क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये सतत उत्साहाचे वातावरण संचारल्याचे दिसत आहे. (The fate of three young Indians illuminated by cryptocurrency; Became a billionaire in a short time)

या नव्या व्हर्चुअल करन्सीच्या प्रेमात पडणारे काही लोक खूप कमी अवधीत अब्जाधीश बनू लागले आहेत. अब्जाधीश व्यक्तीची खुर्ची त्यांच्या स्वप्नातून प्रत्यक्षात आली आहे. सध्या बिझनेस वृत्तपत्रे, वेबसाईट्सपासून सोशल मीडियापर्यंत सगळीकडे क्रिप्टोकरन्सीची जोरदार चर्चा सुरू आहे. अलिकडेच दुबईने स्वत:ची क्रिप्टोकरन्सी लॉन्च केली आहे आणि पहिल्याच दिवशी क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये 1000 टक्क्यांपेक्षा अधिक उसळी पाहायला मिळाली आहे.

भारतालाही मिळाला पहिला अब्जाधीश

याचदरम्यान भारतालाही क्रिप्टोकरन्सीपासून पैसे कमावणारा पहिला अब्जाधीश मिळाला आहे. काही वर्षांपूर्वी पॉलीगॉन लॉन्च करणारे जयंती कनानी, संदीप नैलवाल आणि अनुराग अर्जुन यांनी आता अब्जाधीशांच्या यादीत स्थान पटकावले आहे. मागील एक वर्षात पॉलीगॉन दररोज नव्या उंचीवर पोहोचत आहे. पॉलीगॉन एक प्रकारचा प्लॅटफॉर्म आहे, जो इथेरियमचे भारी शुल्क आणि देवाणघेवाणच्या संथ गतीची समस्या दूर करण्यासाठी बनवलेले आहे.

मूल्यांकनात जबरदस्त वाढ

तांत्रिक भाषेमध्ये पॉलीगॉनला लेयर 2 इथेरियम स्केलिंग सॉल्युशन प्लॅटफॉर्मला म्हटले जाते. लोकप्रियता आणि मार्केट कॅपच्या बाबतीत इथेरियम जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे क्रिप्टोकरन्सी आहे. पॉलीगॉन आजही अधिकाधिक प्रमाणात बिझनेससाठी इथेरियमवर अवलंबून आहे. याशिवाय हे प्लॅटफॉर्म खूप कमी किंमतीत अ‍ॅप्लिकेशन बनवण्यासाठी मदत करतो. इथेरियमसमवेत अन्य क्रिप्टोकरन्सीच्या वाढत्या चलनादरम्यान आता मॅटिकचे मूल्यांकन 2.6 कोटी डॉलरवरून 14 अब्ज डॉलरवर पोहोचले आहे.

भारताचे पहिले क्रिप्टो-अब्जाधीश बनले

मूल्यांकनातील वाढीमुळे पॉलीगॉनच्या संस्थापकांच्या संपत्तीतही जबरदस्त वाढ झाली आहे. त्यामुळेच आता जयंती कनानी, संदीप नैलवाल आणि अनुराग अर्जुन भारताचे पहिले क्रिप्टो-अब्जाधीश बनले आहेत. आता आम्हाला पैशांची गरज नाही. आतापासून आमची गुंतवणूक रणनितीक रुपाने होणार आहे, असे संदीप नैलवाल यांनी एका मुलाखतीत सांगितले. शार्क टँकमुळे लोकप्रिय बनलेले अमेरिकन अब्जाधीश मार्क क्युबन यांनीही पॉलीगॉनमध्ये गुंतवणूक केली आहे. मात्र त्यांनी नेमकी किती रक्कम गुंतवणूक केली आहे, याची माहिती अजून समोर आलेली नाही. मीडियातील वृत्तानुसार, महाराष्ट्र सरकारसुद्धा कोरोना चाचणीचे निदान करण्यासाठी पॉलीगॉनचा वापर करीत आहे. आमचे काही वेंडर्स महाराष्ट्र सरकारसोबत मिळून काम करीत आहेत, असे नैलवाल यांनी स्पष्ट केले आहे. (The fate of three young Indians illuminated by cryptocurrency; Became a billionaire in a short time)

इतर बातम्या

मराठ्यांना आरक्षण मिळावे या मताचे उद्धव ठाकरे कधीच नव्हते, नारायण राणेंचा थेट प्रहार

LPG OFFER ! सिलिंडर खरेदी करा फक्त 9 रुपयात, त्वरा करा, आज शेवटची तारीख