शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा लसीकरणाला उत्स्फुर्त प्रतिसाद, ठाण्यात दिवसभरात 195 जणांनी लस टोचली

परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ठाणे महापालिकेच्यावतीने माजीवडा येथील पोस्ट कोविड लसीकरण केंद्रात 'वॉक इन' पद्धतीने लसीकरण सुरु करण्यात आलं आहे (Students gives good response to Walk In vaccination in Thane)

शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा लसीकरणाला उत्स्फुर्त प्रतिसाद, ठाण्यात दिवसभरात 195 जणांनी लस टोचली
कोरोना लसीकरण

ठाणे : मुंबईपाठोपाठ ठाण्यातही परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘वॉक इन’ लसीकरणाची सुविधा देण्यात येत आहे. महापालिकेच्या पोस्ट कोविड लसीकरण केंद्रात आजपासून (31 मे) ‘वॉक इन’ पद्धतीने लसीकरणास सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असं आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केलं होतं. त्यांच्या या आवाहनाला विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. कारण दिवसभरात तब्बल 195 विद्यार्थ्यांनी लस घेतली आहे (Students gives good response to Walk In vaccination in Thane).

परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ठाणे महापालिकेच्यावतीने माजीवडा येथील पोस्ट कोविड लसीकरण केंद्रात ‘वॉक इन’ पद्धतीने लसीकरण सुरु करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे लसीकरणाच्या या मोहिमेचा आज पहिलाच दिवस होता. पहिल्याच दिवशी 195 विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. या लसीकरणाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून उद्या देखील सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत लसीकरण सुरु राहणार आहे (Students gives good response to Walk In vaccination in Thane).

आदित्य ठाकरे यांच्या ट्विटनंतर परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरणाची सुविधा

परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी जात असलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने लसीकरणाची सुविधा देण्यासंदर्भात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले होते. तसेच महापौर नरेश म्हस्के यांनीही यासंदर्भात पालिका आयुक्तांना पत्र दिले होते. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या ठाणे शहरातील विद्यार्थ्यांना ‘वॉक इन’ पद्धतीने लस देण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रवेशपत्र आणि व्हिसा बघूनच लस

परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे, अशा विद्यार्थ्यांची लसीकरणाअभावी शैक्षणिक संधी वाया जावू नये यासाठी ठाणे महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना माजीवडा येथील पोस्ट कोविड लसीकरण केंद्रात ‘वॉक इन’ लसीकरण सुविधा महापालिकेच्यावतीने उपलब्ध करण्यात आली आहे. यामध्ये ठाणे महापालिका क्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच सदरच्या केंद्रात लस देण्यात येत आहे. तसेच विद्यार्थ्यांचा परदेश प्रवेशपत्र, व्हिसा तसेच संबंधित कागदपत्रांची पडताळणी करूनच लस देण्यात येत आहे. तरी महापालिका क्षेत्रातील परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा : Thane new rules Guidelines : ठाण्यात दुकानांची वेळ बदलली, काय सुरु काय बंद?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI