मुंबईपाठोपाठ ठाण्यातही परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘वॉक इन’ लसीकरणाची सुविधा

मुंबईपाठोपाठ ठाण्यातही परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'वॉक इन' लसीकरणाची सुविधा देण्यात आली आहे. (TMC organize Walk In vaccination for those going abroad for education)

मुंबईपाठोपाठ ठाण्यातही परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'वॉक इन' लसीकरणाची सुविधा
कोरोना लसीकरण

ठाणे: मुंबईपाठोपाठ ठाण्यातही परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘वॉक इन’ लसीकरणाची सुविधा देण्यात आली आहे. महापालिकेच्या पोस्ट कोविड लसीकरण केंद्रात उद्या सोमवार दिनांक 31 मे पासून ‘वॉक इन’ पद्धतीने लसीकरणास सुरुवात होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असं आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केलं आहे. (TMC organize Walk In vaccination for those going abroad for education)

परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे, अशा विद्यार्थ्यांची लसीकरणा अभावी शैक्षणिक संधी वाया जावू नये म्हणून महापालिकेने हा उपक्रम हाती घेतला आहे. परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी जात असलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने लसीकरणाची सुविधा देण्यासंदर्भात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले होते. तसेच महापौर नरेश म्हस्के यांनीही यासंदर्भात पालिका आयुक्तांना पत्र दिले होते. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या ठाणे शहरातील विद्यार्थ्यांना ‘वॉक इन’ पद्धतीने लस देण्याचा निर्णय घेतला आहे.

‘या’ वेळेत लस मिळणार

परदेशात जात असताना लस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळाला आहे, त्यांना माजीवडा येथील पोस्ट कोविड लसीकरण केंद्रात उद्या सोमवार दिनांक 31 मे 2021 पासून सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 या वेळेत ‘वॉक इन’ लसीकरण सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ठाण्यात वास्तव्यास असणाऱ्या आणि उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वैध पुराव्यानिशी म्हणजे परदेश प्रवेश मिळाल्याचे निश्चितीपत्र, परदेशी व्हिसा तसेच संबंधित कागदपत्रांची पडताळणी करून लस देण्यात येणार आहे.

उद्या 50 विद्यार्थ्यांचे लसीकरण

उद्या सोमवारी प्रथम 50 विद्यार्थ्यांना सकाळी 11.00 ते 2.00 या वेळेत लस देण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रतिसादानुसार लसीकरणाचे वेळापत्रक ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी या लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. (TMC organize Walk In vaccination for those going abroad for education)

 

संबंधित बातम्या:

कोविड सेंटरमध्ये सुपरवाझर असल्याचे भासवून चक्क अभिनेत्रीचं लसीकरण, ठाण्यातील धक्कादायक प्रकार

कोरोना काळात आर्थिक विवंचना, त्याने मालकिनीचा विश्वासघात करत डिजेचं साहित्य विकलं, पोलिसांकडून अटक

मस्तच! पुण्यापाठोपाठ ठाणेही सावरतंय; ठाण्यात 76 टक्के खाटा रिक्त

(TMC organize Walk In vaccination for those going abroad for education)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI