Petrol Diesel Price Today : महागाईच्या आगीत कच्चा तेलाची उडी! एकदम उसळी, पेट्रोल-डिझेलचा भाव किती

| Updated on: Mar 29, 2023 | 8:35 AM

Petrol Diesel Price Today : महागाईच्या आगीत कच्चा तेलाने उडी घेतली आहे. कच्चा तेलाचा भाव कमालीचा वधारला आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून भाव घसरणीवर होते. पण आज भाव 80 डॉलरच्या जवळपास गेले. त्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होईल?

Petrol Diesel Price Today : महागाईच्या आगीत कच्चा तेलाची उडी! एकदम उसळी, पेट्रोल-डिझेलचा भाव किती
पेट्रोल-डिझेलचा भाव काय
Follow us on

नवी दिल्ली : कच्चा तेलाने (Crude Oil) महागाईच्या आगीत तेल ओतले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती भडकल्या. अमेरिकेसह युरोपियन राष्ट्रातील अस्थिरता याला कारणीभूत ठरत आहे. तसेच चीनने मागणी वाढवल्याने त्याचा फटका बसत आहे. त्यातच रशियाने मोठ्या प्रमाणावर तेल उत्पादन घटवले आहे. तर तुर्कीने त्यांचा एक प्लॅँट तात्पुरता बंद ठेवला आहे. बँकिग सेक्टरमधील घडामोडींचा मोठा परिणाम डॉलर, सोने-चांदी, शेअर बाजार आणि कच्चा तेलावर होत आहे. त्यामुळे कच्चा तेलाच्या किंमतींनी उसळी घेतली आहे. कच्चा तेलाचा भाव कमालीचा वधारला आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून भाव घसरणीवर होते. पण आज भाव 80 डॉलरच्या जवळपास गेले. त्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होईल? आज टाकी फुल्ल करण्यापूर्वी पेट्रोल-डिझेलचा भाव (Petrol-Diesel Price Today) जरुर तपासा.

कच्चा तेलाची भरारी

आज डब्ल्यूटीआई क्रूड ऑईलमध्ये (WTI Crude Oil) 4डॉलरची वाढ होऊन ते 73.77 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले आहे. तर ब्रेंट क्रूड ऑईलमध्ये (Brent Crude Oil) 3 डॉलरची वाढ झाली, आज हा भाव 79.06 डॉलर प्रति बॅरलवर पोहचला. त्याचा तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol Diesel Price) वाढ तर झाली नाही ना?

हे सुद्धा वाचा

राज्यातील प्रमुख शहरातील इंधनाचा दर (Source:goodreturns)

  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 106.32 तर डिझेल 92.84 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 106.81 तर डिझेल 93.33 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 108 पेट्रोल आणि डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 107.43 आणि डिझेल 93.90 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 107.40 आणि डिझेल 93.90 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.78 तर डिझेल 94.25 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.61 तर डिझेल 93.14 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 108.03 तर डिझेल 94.52 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.25 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
  12. पुण्यात पेट्रोलचा भाव 105.95 आणि डिझेल 92.47 रुपये प्रति लिटर
  13. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.67 रुपये तर डिझेल 93.18 रुपये प्रति लिटर

भाव एका SMS वर

  1. भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
  2. देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
  3. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
  4. पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
  5. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
  6. इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
  7. बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
  8. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
  9. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
  10. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.