Penny Stocks : दीड रुपयांच्या शेअरने आणले वादळ! गुंतवणूकदार पैसे मोजताना थकले राव

Penny Stocks : गुरुवारी शेअर बाजारात सकाळच्या सत्रात मंदी आहे. तरीही या शेअरने मोठी उसळी घेतली आहे. सध्या हा शेअर 1.5 रुपयांवर आहे. त्याने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

Penny Stocks : दीड रुपयांच्या शेअरने आणले वादळ! गुंतवणूकदार पैसे मोजताना थकले राव
Follow us
| Updated on: Mar 09, 2023 | 5:31 PM

नवी दिल्ली : गुरुवारी सकाळी शेअर बाजारात (Share Market) मंदीचे सत्र सुरु होते. तरीही या शेअरने मोठी उसळी घेतली. या पेन्नी शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले. अवघ्या 1.5 रुपयाच्या या शेअरने बीएसई निर्देशांकात (BSE Index) वादळ आणले. त्याने गुंतवणूकदारांना मालामाल केले. इंडिया इन्फोटेक आणि सॉफ्टवेअर ( Indian Infotech and Software) या शेअरमध्ये 10 टक्के उसळी आली आणि या शेअरला सध्या अप्पर सर्किट लागेल आहे. सध्या हा शेअर दीड रुपयांवर व्यापार करत आहे. आयटीसाठीचे उत्पादन तयार करणाऱ्या या कंपनीने जोरदार कामगिरी बजावली आहे. या शेअरमध्ये 8.7 टक्क्यांची तेजी दिसून आली. त्यामुळे गुंतवणूकदारांची चांदी झाली. येत्या काही दिवसात हा शेअर अजून आगेकूच करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

इंडियन इन्फोटेक आणि सॉफ्टवेअर लिमिटेड या आयटी सॉफ्टवेअर उत्पादन करणाऱ्या कंपनीने मोठा फायदा मिळवून दिला. कंपनीचे एकूण मूल्यांकन 137 कोटी रुपये आहे. ही कंपनी एनएसईमध्ये सूचीबद्ध नाही. बीएसईवर सध्या हा शेअर 1.50 रुपयांवर व्यापार करत आहे. ही कंपनी 1982 साली स्थापन झाली होती.

फेडरल रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी व्याजदरात वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. एका अंदाजानुसार, केंद्रीय बँक यावेळी 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्याची शक्यता आहे. ही सातत्याने दुसरी वेळ असेल जेव्हा व्याजदरात 50 बेसिस पॉईंटची वाढ होईल. यापूर्वी फेडरल रिझर्व्हने सलग 75 बेसिस पॉईंटची वाढ केली होती. 22 मार्च रोजी याविषयीचा निर्णय होऊ शकतो. या संकेतामुळे वॉल स्ट्रीट इंडेक्समध्ये चढउतार दिसून आला. त्याचा आशियाच्या बाजारावर परिणाम दिसून आला. गुरुवारी सुरुवातीला बाजारात तेजीचे सत्र नव्हते. एफएमसीजी क्षेत्रात मोठे नुकसान दिसून आले. या क्षेत्रातील सर्वच कंपन्यांमध्ये मोठी घसरण दिसून आली. बाजारात विक्री सत्र सुरु झाल्यानंतर बाजाराला हादरे बसले. पण बीएसई पॉवर आणि बीएसई युटिलिटीजमध्ये प्रत्येकी 1% हून अधिक तेजी दिसून आली.

हे सुद्धा वाचा

गुरुवारी सकाळी 11:10 वाजता बीएसई सेन्सक्स 0.29% घसरुन 60,171 स्तरावर पोहचला. निफ्टी 50 निर्देशांक 0.32% घसरून 17,698 अंकावर आला. निर्देशांकात टाटा स्टील, भारती एअरटेल आणि एनटीपीसी लिमिटेड यांनी कमाई केली तर महिंद्र ॲंड महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज, टेक महिंद्रा यांना आजच्या सामन्यात चमकदार कामगिरी बजावता आली नाही. टॉप ब्रॉडर इंडेक्सने मुख्य निर्देशांकापेक्षा जोरदार कामगिरी बजावली. इतर स्मॉल कॅप कंपन्यां बाजाराच्या हिंदोळ्यावर होत्या. त्यातील काही कंपन्यांनी गुंतवणूकदारांना फायदा मिळवून दिला.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.