50 टक्के भारतीयांची मिळून जेवढी संपत्ती, तेवढी केवळ 9 जणांकडे!

मुंबई : श्रीमंत हे दिवसेंदिवस श्रीमंत होत आहे, तर गरीब हा दिवसेंदिवस गरीब होत आहे. हे तुम्ही ऐकलेच असेल. मात्र ही गोष्ट आता सत्यात उतरताना दिसत आहे. ऑक्सफॅमच्या अहवालानुसार, भारतातील श्रीमंतांच्या संपत्तीमध्ये 2018 साली दररोज 2200 कोटी रुपयांनी वाढली. देशातील एक टक्के लोकांच्या संपत्तीमध्ये गेल्यावर्षी 39 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऑक्सफॅमच्या अहवालानुसार, 2018 मध्ये भारतातील …

50 टक्के भारतीयांची मिळून जेवढी संपत्ती, तेवढी केवळ 9 जणांकडे!

मुंबई : श्रीमंत हे दिवसेंदिवस श्रीमंत होत आहे, तर गरीब हा दिवसेंदिवस गरीब होत आहे. हे तुम्ही ऐकलेच असेल. मात्र ही गोष्ट आता सत्यात उतरताना दिसत आहे. ऑक्सफॅमच्या अहवालानुसार, भारतातील श्रीमंतांच्या संपत्तीमध्ये 2018 साली दररोज 2200 कोटी रुपयांनी वाढली. देशातील एक टक्के लोकांच्या संपत्तीमध्ये गेल्यावर्षी 39 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

ऑक्सफॅमच्या अहवालानुसार, 2018 मध्ये भारतातील निम्म्या लोकसंख्येची आर्थिक वाढ अत्यंत कमी गतीने झाली. 50 टक्क्यांपेक्षा अधिक लोकांच्या संपत्तीमध्ये तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. हेच प्रमाण आंतरराष्ट्रीय स्तरावर श्रीमंतांच्या संपत्तीतील वाढ प्रति दिन 12 टक्क्यांची आहे. तर जगातील गरीब लोकांच्या संपत्तीमध्ये 11 टक्क्यांची घट झाली आहे.

भारतातील निम्म्या लोकांकडे जितकी संपत्ती आहे, तितकी संपत्ती देशातील केवळ नऊ श्रीमंताकडे आहे. भारतातील 10 टक्के लोक अद्यापही कर्जबाजारी असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

जगात 26 लोक असे आहेत, ज्यांच्याकडे 3 अब्ज 50 लाखांपेक्षा जास्त संपत्ती आहे. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांच्याकडे 112 अब्ज एवढी संपत्ती आहे.

भारतातील 77.4 टक्के लोकसंख्येकडे जितकी संपत्ती आहे, तितकी संपत्ती 10 टक्के लोकांकडे आहे. 51.53 टक्के लोकसंख्येकडे जेवढी संपत्ती आहे, तेवढी संपत्ती एक टक्के लोकांकडे आहे. तर 60 टक्के लोकांकडे फक्त 4.8 टक्के संपत्ती आहे.

तसेच या अहवालानुसार, 2018 मध्ये भारतातील अब्जाधीशांच्या यादीत 18 नव्या लोकांचा समावेश होईल. भारतात 119 जणांकडे आता 28 लाख कोटींची संपत्ती आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *