या आहेत भारताच्या सर्वात श्रीमंत 10 फॅमिली, हुरुन इंडियाचा 2025 अहवाल आला

भारतातील काही कुटुंबांचा फॅमिली बिझनस देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देत आहे. हुरुन इंडियाचा रिपोर्ट आला असून या मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनसच्या यादीत अंबानी फॅमिली यंदाही नंबर वनवर आहे. चला तर पाहूयात आणखी कोणती फॅमिली या सामील आहे.

या आहेत भारताच्या सर्वात श्रीमंत 10 फॅमिली, हुरुन इंडियाचा 2025 अहवाल आला
india,s Richest top 10 family
| Updated on: Aug 12, 2025 | 6:57 PM

भारतात उद्योजक कुटुंबाची संख्या सातत्याने वाढत आहे. हुरुन इंडियाच्या अहवाल – २०२५ हुरुन इंडिया मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनसने त्या कुटुंबाची यादी जाहीर केली आहे, ज्यांनी केवळ आपल्या व्यवसायाला अनोखी उंची मिळवून दिली नाही तर भारतीय अर्थव्यवस्थेतही मोठे योगदान दिले आहे. खास बाब म्हणजे यावर्षी पुन्हा अंबानी कुटुंबाने या यादीत पुन्हा पहिले स्थान मिळवले आहे. या यादीत आणखी कोणते भारतीय व्यावसायिक कुटुंबाचा समावेश झाला आहे हे पाहूयात…

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब लागोपाठ दुसऱ्या वर्षी या यादीत पहिले स्थान राखून आहे.त्यांची एकूण संपत्ती आता २८.२ लाख कोटी रुपये झाली आहे.हा भारताच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेचा जवळपास १२ वा हिस्सा आहे. या कुटुंबाच्या ऊर्जा, डिजिटल आणि किरकोळ विक्री क्षेत्रात मोठी भूमिका निभावत आहे. १९५७ मध्ये सुरु झालेल्या अंबानी कुटुंबाचा व्यवसाय आता दुसरी पिढी सांभाळत आहे.

बिर्ला कुटुंबाची दुसऱ्या नंबरवर उडी

कुमार मंगलम बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली आदित्य बिर्ला ग्रुप ६.५ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहचले आहे. सिमेंट आणि मेटल इंडस्ट्रीमध्ये यांचे मोठे नाव आहे. १८५० च्या दशकात बिर्ला कुटुंबाचा व्यवसाय सुरु झाला होता. आता त्यांची चौथी पिढी या व्यवसायाची धुरा सांभाळत आहे.

तिसऱ्या क्रमांकावर जिंदल फॅमिली

JSW ग्रुपचे सज्जन जिंदल यांच्या नेतृत्वाखाली ५.७ लाख कोटी रुपयांच्या संपत्ती सह तिसरे स्थान मिळवले आहे. धातु आणि खाणकाम या क्षेत्रातील मजबूत पकड असल्याने यांना देशाच्या टॉपच्या स्टील उत्पादकात समाविष्ट केले जाते.

भारतातील १० सर्वात श्रीमंत कुटुंबं आणि त्यांची संपत्ती (२०२५ हुरुन लिस्ट)

अंबानी: २८.२ लाख कोटी रुपये

बिर्ला: ६.५ लाख कोटी रुपये

जिंदल: ५.७ लाख कोटी रुपये

बजाज: ५.६ लाख कोटी रुपये

महिंद्रा: ५.४ लाख कोटी रुपये

नाडर:  ४.७ लाख कोटी रुपये

मुरुगप्पा : २.९ लाख कोटी रुपये

प्रेमजी : २.८ लाख कोटी रुपये

अनिल अग्रवाल : २.६ लाख कोटी रुपये

दानी, चोकसी, वकील (एशियन पेंट्स ) : २.२ लाख कोटी रुपये

हुरुन रिपोर्टनुसार, भारतात फॅमिली बिझनसमध्ये सर्वाधिक जादा कमाई करणारे सेक्टर ऊर्जा(Energy), वित्तीय सेवा(Financial Services), आणि सॉफ्टवेअर आणि आयटी (Software & IT) हे आहेत.