पतंजलीचे हे औषध संधीवातावर ठरु शकते गुणकारी, संशोधनात दावा

संधीवात म्हणजे आर्थरायटीस हा आजार आता सर्वसामान्य झाला आहे. आता या आजारावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. आयुर्वेदात यावर उपाय आहे. पतंजली ऑर्थोग्रिट या औषधावर संशोधन करीत आहे. पंतजलीचे ऑर्थोग्रिट या आजारावर गुणकारी ठरु शकते असा दावा संशोधकांनी केला आहे.

पतंजलीचे हे औषध संधीवातावर ठरु शकते गुणकारी, संशोधनात दावा
| Updated on: Jul 04, 2025 | 5:58 PM

आर्थरायटीसला सोप्या भाषेत संधीवात असे म्हणतात. वयस्कर लोकांनाच नव्हे तर चाळीशीतही हा आजार प्रबळ झाला आहे. आयुर्वेदात यावर उपचार आहेत. पतंजलीच्या ऑर्थोग्रिट औषधाने या आजारावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. पतंजलीच्या वतीने केलेल्या एका संशोधनात हे स्पष्ट झाले आहे. या संशोधनाला Elsevier प्रकाशनाच्या आंतरराष्ट्रीय रिसर्च जर्नल Pharmacological Research Reports मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. हा अभ्यास दर्शवतो की ऑर्थोग्रिट संधिवाताने होणारी सूज कमी करणे, कार्टीलेजचं घर्षण कमी करणे, सांध्यांची कार्यक्षमता वाढवणे यात हे औषध उपयोगी आहे.

आजच्या काळात अपवादानेच एखादी वृद्ध व्यक्ती असेल जी गुडघे दुखीने त्रस्त नसेल. सध्याची उपचार पद्धती केवळ लक्षणांवर कार्य करते. मुळापर्यंत जात नाही.आयुर्वेद प्रत्येक रोगाच्या मुळापर्यंत जाऊन त्यावर उपचाराचा तोडगा काढता असे पतंजलीचे आचार्य बालकृष्ण यांनी म्हटले आहे.ऑर्थोग्रिट याच आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान याचा संगम आहे , जो संधीवात सारख्या असाध आजाराला मुळापासून समाप्त करण्याची क्षमता राखतो.

या वस्तूपासून बनले ऑर्थोग्रिट

आचार्य बालकृष्ण यांनी सांगितले की ऑर्थोग्रिटमध्ये वचा, मोथा, दारूहळद, पिप्पलमूल, अश्वगंधा, निर्गुंडी, पुनर्नवा सारख्या नैसर्गिक जडीबुटींचा वापर केला आङे. सनातन संस्कृतीत प्राचीन काळापासून संधीवात, सुजेसाठी ही औषधं उपयोगी आहेत. पतंजली संशोधन केंद्राचे वरिष्ठ संशोधक डॉ. अनुराग वार्ष्णेय यांनी सांगितले की संधीवात असा जुना रोग आहे जो कोट्यवधी लोकांना प्रभावित करत आहे. आम्ही या संशोधनात कार्टीलेज पेशींच्या 3D Spheroids आणि C. elegansवर अभ्यास केला.

कार्टिलेजला कमजोर होण्यापासून वाचवते

ऑर्थोग्रिट मानवी कार्टिलेज पेशींना सूजेपासून वाचवते. Reactive Oxygen Species ( ROS ) ला कमी करते आणि IL-6, PEG-2 आणि IL-1β सारख्या Inflammatory Markers च्या स्तराला घटवते. तसेच JAK2, COX2 , MMP1, MMP3, ADAMTS-4 च्या Genes Expression लाही ठिक केले. औषधावरील संशोधन सांगते की पतंजलीच्या ऑर्थोग्रिट औषधाने केवळ संधीवाताची लक्षणं कमी केलीच शिवाय आजाराची वाढही रोखली.