170 वर्षांपासून या Rum चा बाजारात दबदबा; थंडीची चाहुल लागताच मागणीत वाढ
Winter Rum: अजूनही या रमची क्रेझ कमी झालेली नाही. ही रम 170 वर्षांपासून देशात विक्री होत आहे. पण तिची मागणी कधीच कमी झाली नाही. थंडीत या रमची क्रेझ अजून वाढते. कोणती आहे ही रम?

170 years Old Rum: देशात चोर पावलांनी थंडी आली नि गायबही झाली. पण थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा व्हिस्की ऐवजी रमची मागणी वाढणार आहे. या रमची मागणी थंडीत अधिक वाढते. थंडीत गरमी येण्यासाठी अनेक जण रमकडे वळतात. काही जण पावसाळ्यातही तिचा अस्वाद घेतात. पण अजूनही या रमची क्रेझ कमी झालेली नाही. ही रम 170 वर्षांपासून देशात विक्री होत आहे. पण तिची मागणी कधीच कमी झाली नाही. थंडीत या रमची क्रेझ अजून वाढते. कोणती आहे ही रम?
ओल्ड मंकची क्रेझ कायम?
1855 मध्ये एडवर्ड डायर याने स्वस्त बिअरसाठी हिमाचल प्रदेशातील कसौली येथे एक दारु कारखाना सुरु केला होता. पुढे या कारखान्याचे मालक बदलत गेले. अखेर मोहन मिकीन प्रायव्हेट लिमिटेड नावाने डिस्टलरी सुरु झाली. ओल्ड मंक मोहन मिकीनचे वेद रतन मोहन यांनी तयार केली. त्यांनी भारतात पहिल्यांदा 1960 च्या दशकात ही रम देशात आणली. कपिल मोहन यांचे भाऊ कर्नल वेद मोहन, बेनेडिक्टिन मोंक्स यांनी त्यासाठी प्रयत्न केल्याचे मानले जाते. ओल्ड मंक शिवाय हरक्यूलिस रम ही सशस्त्र दलांसाठी तयार करण्यात येत असे.
कोणतीही जाहिरात नाही
ओल्ड मंक ही एक खास भारतीय डार्क रम आहे. यामध्ये 42.8 टक्के अल्कोहल असते. या रमचे उत्पादन उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे होते. तर त्याची नोंद हिमाचल प्रदेशातील सोलन येथे करण्यात आली आहे. या रमची कोणतीही जाहिरात करण्यात येत नाही. तोंडी प्रचारावर ही रम देशभरातील मद्यप्रेमींची आवडती झाली आहे. ओल्ड मंक ही गेल्या काही वर्षांपासून सर्वात मोठा परदेशी दारूचा ब्रँड म्हणून पण अग्रस्थानी आहे.
ओल्ड मंकचा नफा आणि महसूल
ओल्ड मंकचा नफा आणि महसूल सातत्याने वाढत आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये पॅरेंट कंपनी मोहन मिकीन लिमिटेडचा एकूण महसूल 2,166.5 कोटी रुपये होता. तर कंपनीचा एकूण नफा जवळपास 102.6 कोटी रुपये होता. माहितीनुसार, कंपनीच्या नफ्यात 21 टक्क्यांहून अधिकची वाढ दिसून आली. तर महसूलात 11.6 टक्क्यांची वाढ दिसली. तर प्रॉफिट बिफोर टॅक्सचा आकडा 138.19 कोटी रुपये इतका होता. तर कंपनीचे प्रॉफिट मार्जिन 4.79 टक्के आहे.
विक्रीत मोठी वाढ
ईटी ब्रांडइक्विटीच्या वृत्तानुसार, 2024 मध्ये ओल्ड मंकने 1.3 कोटी केस विक्री झाली. प्रतिस्पर्ध्यापेक्षा हा आकडा अधिक असल्याचे सांगितले जाते. कंपनीच्या महसूलात मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. आर्थिक वर्ष 18 आणि आर्थिक वर्ष 24 दरम्यान विक्रीत तिप्पट वाढ झाली. रमची विक्री 2,166 कोटी रुपये इतकी आहे. तर नफ्यात 103 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
