2 ऑक्टोबर रोजी नाही चालणार UPI, व्यापाऱ्यांची ‘नो युपीआय डे’ ची घोषणा

No UPI Day on 2 October: 15 ऑक्टोबरपासून देशभरात युपीआय पेमेंटवर मर्चेंट डिस्काऊंट रेट (MDR) लागू होणार आहे. त्याविरोधात व्यापाऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. आता 2 ऑक्टोबर रोजी, महात्मा गांधी जयंती दिवशी व्यापाऱ्यांनी 'नो UPI डे' ची घोषणा केली आहे.

2 ऑक्टोबर रोजी नाही चालणार UPI, व्यापाऱ्यांची नो युपीआय डे ची घोषणा
नो युपीआय डे
| Updated on: Sep 24, 2026 | 10:51 AM

Traders against UPI MDR Charges: युपीआय शुल्काविरोधात आता व्यापारी थेट मैदानात उतरले आहे. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया व्यापारी मंडळाने (FAIVM) आणि कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) सारख्या प्रमुख संघटनांनी गांधी जयंती दिनी, 2 ऑक्टोबर रोजी नो युपीआय डे ची घोषणा केली आहे. म्हणजे या दिवशी व्यापारी युपीआय पेमेंट स्वीकारणार नाहीत. ग्राहकांना हा व्यवहार एकतर रोखीत करावा लागेल अथवा क्रेडिट कार्डचा वापर करून त्यांचे साहित्य खरेदी करावे लागेल.

व्यापाऱ्यांचा विरोध कशाला?

UPI व्यवहारावरील 0.4% मर्चेंट डिस्काउंट रेट (MDR) शुल्कामुळे व्यापारी नाराज झाले आहेत. या शुल्काला व्यापाऱ्यांचा विरोध आहे. पेट्रोल, डिझेल, किराणा, इलेक्ट्रॉनिक्स आणि अन्नधान्यसारख्या वस्तू, उत्पादनावर अगोदरच नफा कमी मिळतो. आता त्यावर पुन्हा नवी कराचा बोजा टाकण्यात येत आहे. वरवर ही रक्कम जरी छोटी वाटत असली तरी मोठ्या व्यवहारांवर व्यापाऱ्यांच्या खिशाला मोठी झळ बसेल. इंदुर येथील रिटेल गारमेंट्स असोसिएशनने यापूर्वीच इशारा दिला आहे की, जर 15 ऑक्टोबरपूर्वी एमडीआरचा निर्णय मागे घेतला नाही तर ते UPI QR कोड मशीनच नदीत प्रवाहित करतील.

सरकारच्या या निर्णयाने व्यापारी संतापले आहेत. काल 23 सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशातील भोपाळ, इंदुर, जबलपूर आणि ग्वालियर सारख्या शहरात जवळपास 125 व्यापारी संघटनांनी अगोदरच ‘नो UPI डे’ ची अंमलबजावणी केली. अनेक राज्यात आंदोलनाचं लोण पसरलं आहे. यामुळे जवळपास 25% व्यापार प्रभावित झाला आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स (MACCIA) आणि पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशनने सुद्धा या एक दिवसाच्या युपीआय बंदला पाठिंबा दिला आहे.

‘नो UPI डे’ समर्थनासाठी व्यापारी मैदानात

बिझनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष रवींद्र मंगवे यांनी स्पष्ट केले आहे की, 2 ऑक्टोबर रोजी ‘नो UPI डे’ ची अंमलबजावणी करण्यात येईल. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशातील अनेक राज्यात या दिवशी युपीआयचा व्यापारी वापर करणार नाहीत. MACCIA आणि संलग्नित 500 संघटना त्यांचा विषय आणि अडचणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशन, ऑल इंडिया कंझ्युमर प्रोडक्ट्स डिस्ट्रीब्युटर्स फेडरेशन, ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशन, ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ फेडरेशन आणि अखिल भारतीय खाद्य तेल व्यापारी महासंघ यासह इतर अनेक संघटनांनी 2 ऑक्टोबर रोजी ‘नो UPI डे’ ला पाठिंबा दिला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us