Sonam Wangchuk: सीजेपीने हात झटकले? सोनम वांगचुक यांच्या मदतीसाठी कोणीच पोहोचले नाही
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांनी लडाखमध्ये आपली पदयात्रा केली, पण कॉकरोच जनता पार्टीचा कोणताही मोठा नेता यात सामील झाला नाही. वांगचुक यांनी कॉकरोचांना उद्देशून एक व्हिडिओ बनवून सर्वांना मदतीची अपील केली होती.

कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनाचा भाग म्हणून २६ दिवस उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे सध्या चर्चेत आहेत. त्यांनी लडाखसाठी पदयात्रा सुरु केली आहे. त्यासाठी त्यांनी कॉकरोच जनता पार्टीचा पाठिंबा मिळालेला नाही. सोनम वांगचुक यांच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी CJP चा एकही प्रमुख नेता लडाखला गेला नाही. अभिजीत दीपके, सौरभ दास किंवा आशुतोष रांका यांनी मोर्चाला पाठिंबा दर्शवला, परंतु त्यात सहभागी होणे टाळले.
लडाखला पूर्ण राज्य दर्जा देण्याची आणि सहाव्या अनुसूचीअंतर्गत घटनात्मक संरक्षण उपायांची मागणी करणारे आंदोलन केले होते. या आंदोलनात २४ सप्टेंबर २०२५ रोजी केंद्रशासित प्रदेशात हिंसाचार झाला होता आणि चार जणांचा मृत्यू झाला होता. याच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी बुधवारी लेहमध्ये एक प्रतीकात्मक पदयात्रा केली. सोनम वांगचुक यांनी १९ ते २४ सप्टेंबरपर्यंत पदयात्रा असेल असे सांगितले होते. विशेष म्हणजे त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये आवाहन केले होते. परंतू जंतर-मंतरवरील एकही कॉकरोच तेथे दिसला नाही. पदयात्रेत सीजेपीचे मोठे नेते गेले नाहीत
वांगचुकच्या अपीलवर अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी लडाखच्या समर्थनाबाबत लिहिले होते. मात्र, यापैकी कोणत्याही नेत्याने ना लडाखला जाण्याची घोषणा केली होती, ना नकार दिला होता. नंतर वांगचुक यांनी खराब हवामान लक्षात घेऊन चार दिवसांची यात्रा स्थगित केली आणि फक्त २३ सप्टेंबरला एक दिवसाच्या पदयात्रेची घोषणा केली. बुधवारी जेव्हा काही नागरिकांसोबत वांगचुक लेहकडे निघाले, तेव्हा त्यांच्यासोबत लडाखव्यतिरिक्त काही इतर प्रदेशांतून आलेले लोकही होते. मात्र, सीजेपी नेते अभिजीत दीपके, सौरभ दास किंवा आशुतोष रांका तिथे दिसले नाहीत.
२० जणांवरील खटले मागे
लडाखचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी गेल्या वर्षी २४ सप्टेंबरला लेहमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात २० जणांवर दाखल गुन्हेगारी प्रकरणे मागे घेण्याची बुधवारी घोषणा केली. सक्सेना यांनी ‘एक्स’वर एका पोस्टमध्ये म्हटले, “मी लडाखमध्ये शांतता आणि सामाजिक सौहार्दाच्या व्यापक हिताला लक्षात घेऊन लेहमध्ये गेल्या वर्षी २४ सप्टेंबरला झालेल्या दुर्दैवी हिंसाचाराशी संबंधित २० व्यक्तींविरुद्ध दाखल गुन्हेगारी प्रकरणे मागे घेण्यास मंजुरी दिली आहे.” त्यांनी सांगितले की, लडाख पोलिसांनी व्यापक समीक्षेनंतर लेह ठाण्यात दाखल एफआयआर क्रमांक १४४/२००५ मधील २० जणांविरुद्धचे प्रकरण समाप्त करण्याची शिफारस केली होती.
