
Union Budget 2026-27: केंद्रीय अर्थमंत्री, केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 कधी सादर करतील यावरून खल सुरू आहे. 2017 पासून प्रत्येक वर्षी 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता बजेट सादर करण्यात येते. यापूर्वी दोनदा शनिवारी बजेट सादर झाले आहे. त्यावेळी एक फेब्रुवारी रोजी शनिवार आला होता. पण पुढील वर्षी 1 फेब्रुवारी रोजी रविवार येत आहे. 1 फेब्रुवारी 2026 रोजी रविवार आहे. त्यामुळे या दिवशी बजेट सादर होईल की नाही, याविषयीचा संभ्रम तयार झाला आहे. सरकारने याविषयीची कोणतीही भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. अर्थसंकल्प सादर करण्यास अजून जवळपास एक महिना असल्याने सरकार लवकरच याविषयीची भूमिका सादर करेल.
तर 1 फेब्रवारीच्या अगोदर 31 जानेवारी 2026 शनिवारी येत आहे. त्यामुळे एक दिवस अगोदर अर्थसंकल्प सादर होणार का, अशी एक चर्चा होत आहे. तर दुसरीकडे 2 फेब्रुवारी 2026 रोजी सोमवार असल्याने आणि त्यादिवशी शेअर बाजार आणि इतर सर्व सुरु असल्याने त्याच दिवशी अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता वर्तवण्यता येत आहे. 2017 मध्ये 1 फेब्रुवारी रोजी पहिल्यांदा तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर केला होता.
मग कधी सादर होणार बजेट?
एक वर्षापूर्वी 2025 मध्ये 1 फेब्रुवारी रोजी शनिवार होता. त्या दिवशी अंतरिम बजेट सादर करण्यात आले होते. त्यापूर्वी एका शनिवारी अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. पण 1 फेब्रुवारी 2026 रोजी रविवार आहे. रविवारी सरकारी कार्यालये आणि शेअर बाजाराला सुट्टी होती. यंदा 1 फेब्रुवारी रोजी संत रविदास महाराज यांची जयंती आहे. त्यामुळे यंदा अर्थसंकल्प 31 जानेवारी अथवा 2 फेब्रुवारी 2026 रोजी सादर होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, याविषयीचा निर्णय संसदीय कॅबिनेट समिती करेल.
यापूर्वी का बदलली तारीख?
असं पहिल्यांदा झालं नाही की, अर्थसंकल्प हा आठवड्याच्या अखेरीस आला. यापूर्वी पण अनेकदा असं झालं. भारत सरकारने अनेकदा बजेट सादर करण्याचा दिवस हा शनिवारच ठरवला आहे. त्यामुळे संसदेची दिनदर्शिकेनुसार ते सुलभ होते. गेल्यावर्षी केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 शनिवारी सादर करण्यात आला होता. तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 28 फेब्रुवारी 2015 रोजी बजेट सादर केले होते. त्यादिवशी शनिवार होता. 2016 मध्ये त्यांनी 27 फेब्रुवारी रोजी शनिवारी अर्थसंकल्प सादर केला होता. यापूर्वी 3 मार्च 2001 (शनिवार) आणि 28 फेब्रुवारी 2004 (शनिवार) अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता.