
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेला केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2026) आज संसदेत सादर केला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सकाळी ११ वाजता संसदेत आपला नववा अर्थसंकल्प मांडून इतिहास रचणार आहेत. विशेष म्हणजे, संसदीय इतिहासात प्रथमच अर्थसंकल्प रविवारी सादर केला जात आहे. विशेष म्हणजे, यंदा प्रथमच अर्थसंकल्प रविवारी सादर होत आहे. याद्वारे विकसित भारत या संकल्पनेला बळकटी देणारे मोठे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या अर्थसंकल्पात जागतिक अस्थिरता आणि अमेरिकेसोबतचे व्यापारी संबंध या पार्श्वभूमीवर विकसित भारतचा रोडमॅप स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील. त्यानंतर सकाळी १०:१५ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होईल. या बैठकीत अर्थसंकल्पाच्या प्रस्तावांना औपचारिक मंजुरी मिळाल्यानंतर ठीक ११ वाजता लोकसभेत अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात होईल.
यंदाच्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना आणि नोकरदारांना प्राप्तीकरात (Income Tax) मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी सरकार किसान कार्ड खेळण्याची शक्यता आहे.
दरम्यान यंदाच्या अर्थसंकल्पात महागाई कमी करणे आणि सामान्यांच्या खिशाला परवडणारे निर्णय घेणे, हेच सरकारचे मुख्य उद्दिष्ट राहण्याची शक्यता आहे. या बजेटमधून नोकरदार, शेतकरी आणि महिलांना मोठे गिफ्ट मिळण्याची अपेक्षा संपूर्ण देश व्यक्त करत आहे.