PAN Aadhaar Linking Last Date : पॅन कार्डला आधारशी लिंक करण्याची आज शेवटची तारीख, पटापट करा अपडेट

आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पॅन आधारशी जोडलं नाही तर पॅन कार्ड धारकांना आयकर कायद्यानुसार दंड भरावा लागेल.

PAN Aadhaar Linking Last Date : पॅन कार्डला आधारशी लिंक करण्याची आज शेवटची तारीख, पटापट करा अपडेट
पॅनकार्ड आणि आधारकार्ड
Follow us
| Updated on: Mar 31, 2021 | 11:20 AM

मुंबई : आयकर भरणाऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे. आयकर विभागाने (Income Tax Department) पॅन कार्डला (PAN) आधारशी जोडण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2021 पर्यंत निश्चित केली आहे. असं केलं नाही तर तुमचं पॅनकार्ड (PAN Card) उपयोगी राहणार नाही. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पॅन आधारशी जोडलं नाही तर पॅन कार्ड धारकांना आयकर कायद्यानुसार दंड भरावा लागेल. जर दंड टाळायचा असेल तर अंतिम मुदत संपण्यापूर्वी पॅनला आधारशी लिंक करा. (Update your pan card with aadhaar card here is all details)

अधिक माहितीनुसार, 31 मार्चनंतर, ज्यांचे पॅन आधारशी जोडलं जाणार नाही त्यांचे पॅनकार्ड 1 एप्रिल 2021 पासून डिअॅक्टिव्हेट केलं जाईल. एकदा का जर तुमचं पॅनकार्ड बंद झालं तर ते पुन्हा सुरू करण्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल. हल्ली इनकम टॅक्स रिटर्न (आयटीआर) दाखल करण्यासाठी, पॅन कार्जसह आधार क्रमांक देणंसुद्धा आवश्यक असणार आहे. याची शेवटची तारीख 30 जून 2020 होती, जी 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे तातडीने हे काम करून घ्या.

पॅनकार्ड होऊ शकतं बाद किंवा आकारला जाऊ शकतो दंड

पॅनकार्ड आधारशी लिंक न केल्यास ते बाद ठरते. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्च 2021 नंतर कोणतेही बाद झालेले पॅनकार्ड जर तुम्ही वापरले तर प्राप्तिकर कलम 272 बी अंतर्गत 10,000 रुपये दंड आकारला जातो. त्यामुळे जर करदात्यांनी 31 मार्चपर्यंत पॅन आणि आधार कार्ड लिंक केलं नाही तर पॅनकार्ड बाद होऊ शकतं.

पॅनकार्ड रद्द झालं तर काय अडचणी येतील?

जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल, पण ते आधारशी लिंक नसेल तर ते अवैध ठरवले जाईल आणि त्याचा काही उपयोग होणार नाही. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची आधार योजना घटनात्मक वैध म्हणून घोषित केली होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैध पॅन कार्डशिवाय रिटर्न भरणंदेखील शक्य नाही.

पॅनकार्ड कसे जोडाल आधार कार्डशी?

– आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट incometaxindiaefiling.gov.in वर लॉगइन करा.

– इथे तुम्हाला आधार लिंक करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

– त्यानंतर तुमचा पॅन नंबर, आधार क्रमांक, तुमचे नाव खाली असलेल्या बॉक्समध्ये भरा.

– यानंतर कॅप्चा कोड काळजीपूर्वक पाहा आणि बॉक्समध्ये भरा.

– सर्व माहिती भरल्यानंतर आधारशी लिंक अशा पर्यायावर क्लिक करा. (Update your pan card with aadhaar card here is all details)

संबंधित बातम्या – 

Bank Holidays List : एप्रिलमध्ये तब्बल 15 दिवस बँका बंद, वाचा संपूर्ण लिस्ट

25 हजारात सुरू करा बिझनेस, महिन्याला कमवाल 1.40 लाख रुपये; वाचा सविस्तर

भविष्यासाठी PNB च्या खास योजनेत करा गुंतवणूक, जबरदस्त आहे फायदा

(Update your pan card with aadhaar card here is all details)
Non Stop LIVE Update
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.