उद्यापासून UPI च्या ‘या’ व्यवहारांवर बंदी, नवे नियम काय माहीत आहेत का?

UPI Payment: तुमच्या UPI आयडीमध्ये स्पेशल कॅरेक्टर्स असतील तर 1 फेब्रुवारीनंतर तुमचा ट्रान्झॅक्शन ब्लॉक होऊ शकतो. NPCI ने सर्व पेमेंट अ‍ॅप्सना नवीन नियमानुसार आपली सेवा अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

उद्यापासून UPI च्या ‘या’ व्यवहारांवर बंदी, नवे नियम काय माहीत आहेत का?
1 फेब्रुवारीपासून UPI च्या ‘या’ व्यवहारांवर बंदी
| Edited By: | Updated on: Jan 31, 2025 | 4:45 PM

UPI New Rule: तुम्हीही UPI ने पेमेंट करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) UPI व्यवहारांबाबत नवा नियम लागू केला आहे. या नियमांतर्गत विशेष अक्षरे (@, #, $, %) असलेले UPI ट्रान्झॅक्शन ID यापुढे वैध मानले जाणार नाहीत.

अल्फान्यूमेरिक अक्षरे (अक्षरे आणि अंक) तयार केलेले UPI ट्रान्झॅक्शन आयडीच पेमेंट स्वीकारू शकतील. त्याचे पालन न करणाऱ्यांचा ID ब्लॉक करण्यात येणार आहे. हा नवा नियम 1 फेब्रुवारी 2025 पासून लागू होणार आहे.

NPCI ने ‘हा’ निर्णय का घेतला?

UPI आता भारतातून परदेशात डिजिटल पेमेंटचे महत्त्वाचे साधन बनले आहे. श्रीलंका, भूतान, यूएई, मॉरिशस आणि फ्रान्स या देशांमध्येही याचा वापर केला जात आहे. UPI व्यवहार अधिक सुरक्षित आणि सुरळीत करण्यासाठी हा नवा नियम लागू करण्यात येत आहे.

UPI ट्रान्झॅक्शन आयडीमध्ये विशेष अक्षरे असतील तर?

तुमच्या UPI ट्रान्झॅक्शन आयडीमध्ये स्पेशल कॅरेक्टर्सचा समावेश असेल तर 1 फेब्रुवारीनंतर तुमचा ट्रान्झॅक्शन ब्लॉक होऊ शकतो. NPCI ने सर्व पेमेंट अ‍ॅप्सना नवीन नियमानुसार आपली सेवा अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

NPCI ने यापूर्वी UPI युजर्सना अल्फान्यूमेरिक ID वापरण्यास सांगितले होते. मात्र, आता हे बंधनकारक करण्यात आले असून नियमांचे पालन न केल्यास UPI ट्रान्झॅक्शन ID ब्लॉक होऊ शकतो.

UPI युजर्सनी काय करावे?

तुमच्या UPI ट्रान्झॅक्शन ID मध्ये खास कॅरेक्टर असेल तर ते लवकरात लवकर बदलून टाका. नवीन अल्फान्यूमेरिक ID तयार करण्यासाठी आपल्या बँक किंवा पेमेंट अ‍ॅपशी संपर्क साधा, जेणेकरून 1 फेब्रुवारीनंतरही आपले UPI ट्रान्झॅक्शन ID कोणत्याही अडथळ्याशिवाय चालू राहतील.

भारताच्या डिजिटल पेमेंटमध्ये UPI चा वाटा 83 टक्के

भारताच्या डिजिटल पेमेंट प्रणालीमध्ये युनिफाईड पेमेंट इंटरफेसचा (UPI) वाटा 2019 मधील 34 टक्क्यांवरून 2024 मध्ये 83 टक्क्यांवर पोहोचला आहे. या काळात UPI 74 टक्के चक्रवाढ सरासरी वाढीच्या दराने (CAGR) वाढला आहे.

RTGS, NEFT, IMPS, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड सारख्या इतर पेमेंट सिस्टमचा हिस्सा 66 टक्क्यांवरून 17 टक्क्यांवर आला आहे, असे रिझर्व्ह बँकेच्या अहवालात म्हटले आहे. देशातील डिजिटल पेमेंट सिस्टीम पुढे नेण्यात UPI महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. याचे कारण UPI वापरणे सोपे आहे.