UPI युझर्स सावधान, वॉलेटचा वापर थांबवला? मग दंडाचा फटका बसणार? बँक खात्यातून कापले जाणार पैसे?

UPI App Wallet Facility Penalty: अनेक युपीआय ॲप युझर्सला वॉलेटची सुविधा देतात. पण या सुविधेचा जर तुम्ही अनेक दिवस वापर केला नाहीतर दंड लागू शकतो का? बँक खात्यातून पैसे कपात होऊ शकतात का?

UPI युझर्स सावधान, वॉलेटचा वापर थांबवला? मग दंडाचा फटका बसणार? बँक खात्यातून कापले जाणार पैसे?
तर दंडाचा फटका बसणार?
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 23, 2026 | 4:10 PM

UPI App Wallet Facility Penalty: सध्या समाज माध्यमांवर युपीआय ॲप विषयी एक माहिती व्हायरल झाली आहे. अनेक वृत्ताचा दाखल देत असा दावा करण्यात येत आहे की, दीर्घकाळ जर तुम्ही युपीआय ॲपच्या वॉलेट या सुविधेचा वापर केला नाही तर युपीआय कंपन्या युझर्सला दंड आकारू शकतात. त्यानंतर असा सवाल विचारल्या जात आहे की, बँक खात्यातून पैसे कपात होऊ शकतात का? काय आहे याविषयीचा नियम?

काय आहे हे प्रकरण?

फोन पे वॉलेटशी संबंधित एका इन ॲक्टिव्हिटी शुल्काविषयी चर्चा सुरू आहे. त्याचा अर्थ जर एखाद्या युझर्सने अनेक दिवसांपर्यंत त्याच्या वॉलेटचा वापर केला नाही तर त्याला शुल्क आकारल्या जाऊ शकते. पण हे शुल्क केवळ वॉलेटवर लागू होते, थेट बँक खात्यावर नाही, असा दावा यासंबंधीच्या सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये करण्यात येत आहे.

बँक खात्यातून पैसे कपात होणार?

सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर तुमच्या फोन पेच्या वॉलेटमध्ये शिल्लक रक्कम नसेल आणि वॉलेट केवळ सक्रिय असले तर तुमच्या बँक खात्यातून थेट पैसे कपात होणार नाहीत. म्हणजे लिंक्ड बँक खाते एकदम सुरक्षित असेल. इनॲक्टिव्हिटी शुल्क केवळ वॉलेटमधील बँलेन्स, शिल्लक रक्कमेवर लागू असेल. जर एखाद्या युझर्सने दीर्घकाळ हे वॉलेट वापरले नाहीतर आणि त्यात रक्कम असेल तर शुल्क आकारले जाऊ शकते.

वॉलेट आणि बँक खात्यात अंतर काय?

अनेक लोकांना फोन पे ॲप आणि फोन पे वॉलेट एकच वाटतात. पण दोन्ही स्वतंत्र आहेत. युपीआय पेमेंट थेट बँकेतून होते. तर वॉलेटमध्ये अगोदरच पैसे असतात. जर तुम्ही केवळ UPI चा वापर करत असाल आणि वॉलेटमध्ये पैसे ठेवत नसाल तर चिंता करण्याची कोणतीही गरज नाही.

तुम्हाला काय करावे लागेल?

वॉलेट बँलन्स तपासत राहा

जर गरज नसेल तर वॉलेट रिकामे ठेवा

ऑफिशियल नोटीसवर लक्ष ठेवा

कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका

दुसऱ्या युपीआय ॲप्सला पण असेच नियम?

काही डिजिटल वॉलेट कंपन्या खाते निष्क्रिय ठेवल्यास वॉलेटमध्ये शिल्लकीवर निष्क्रियता शुल्क आकारतात. अर्थात प्रत्येक कंपनीचे याविषयीचे नियम वेगवेगळे आहेत. पण तुम्ही वॉलेटचा वापर केला नाही म्हणून तुमच्या बँक खात्यातून थेट पैसे कपात होत नाहीत.

Follow Us