कुमारमंगलम बिर्लांच्या ‘त्या’ पत्रामुळे व्होडाफोन-आयडियाच्या समभागाच्या किंमतीत घसरण

Vodafone Idea | मंगळवारी व्होडाफोन-आयडियच्या समभागाने 6.03 रुपये ही 52 आठवड्यातील निच्चांकी पातळी गाठली होती. या कंपनीची आर्थिक अवस्था चांगली नाही. कंपनीच्या डोक्यावर तब्बल 50 हजार कोटींचे कर्ज आहे.

कुमारमंगलम बिर्लांच्या 'त्या' पत्रामुळे व्होडाफोन-आयडियाच्या समभागाच्या किंमतीत घसरण
व्होडाफोन आयडिया
Follow us
| Updated on: Aug 05, 2021 | 6:32 AM

मुंबई: आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमारमंगलम बिर्ला यांनी केंद्र सरकारला लिहलेल्या पत्रामुळे भांडवली बाजारात व्होडाफोन-आयडियाच्या समभागाने आपटी खाल्ली आहे. सलग दुसऱ्या दिवशी व्होडाफोन-आयडियचा समभाग डळमळीत होताना दिसला. बुधवारी दुपारच्या सत्रात या समभागाची किंमत 6.12 रुपये इतकी होती.

तत्पूर्वी मंगळवारी व्होडाफोन-आयडियच्या समभागाने 6.03 रुपये ही 52 आठवड्यातील निच्चांकी पातळी गाठली होती. या कंपनीची आर्थिक अवस्था चांगली नाही. कंपनीच्या डोक्यावर तब्बल 50 हजार कोटींचे कर्ज आहे. त्यामुळे व्होडाफोन-आयडियाकडून लवकरच गाशा गुंडाळला जाण्याची शक्यता आहे.

कुमारमंगलम बिर्ला यांनी पत्रात काय म्हटले होते?

आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या Vodafone-Idea लिमिटेड कंपनीतील आपला हिस्सा सरकार किंवा अन्य कंपनीला विकण्याची तयारी दर्शविली आहे. कुमार मंगलम बिर्ला यांनी कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांना पत्र लिहून यासंदर्भात माहिती दिली होती.

Vodafone-Idea लिमिटेडच्या डोक्यावर 58,254 कोटी रुपयांचे कर्ज होते. यापैकी 7,854.37 कोटी रुपयांचे कर्ज कंपनीने फेडले होते. मात्र, अजूनही कंपनीच्या डोक्यावर 50,399.63 कोटींचे कर्ज आहे. Vodafone-Idea लिमिटेडमध्ये कुमार मंगलम बिर्ला यांचा 27 टक्के हिस्सा आहे. त्यांनी राजीव गौबा यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, स्पेक्ट्रमचे पैसे भरण्यासाठी पुरेसा अवधी आणि अन्य काही गोष्टी जुळून न आल्याने कंपनीत कोणीही गुंतवणूक करण्यास इच्छूक नाही, असे कुमार मंगलम बिर्ला यांनी म्हटले. गेल्याच महिन्यात केंद्र सरकारने Vodafone-Idea लिमिटेडला परकीय गुंतवणुकीच्या माध्यमातून 15000 कोटी रुपयांचा निधी उभारण्याची परवानगी दिली होती. मात्र, सरकारी धोरणामुळे कोणीही कंपनीत गुंतवणूक करण्यास तयार नाही, असे कुमारमंगलम बिर्ला यांनी पत्रात म्हटले होते.

व्होडाफोन आयडियाने आपल्या 27 कोटी वापरकर्त्यांना दिला इशारा

व्होडाफोन आयडिया (Vi) ने आपल्या 27 कोटी वापरकर्त्यांना ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांपासून दूर राहण्यास सांगितले आहे. हे फसवणूक करणारे नो युवर कस्टमर (KYC) च्या माध्यमातून वापरकर्त्यांना लक्ष्य करत आहेत. सायबर फसवणुकीसंदर्भात एअरटेलने जारी केलेल्या अॅडवायजरीनंतर व्हीआय(Vi)चा इशारा आला आहे. एअरटेलच्या सर्व ग्राहकांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात फसवणूक करणारे नवीन तंत्रज्ञानाद्वारे मोबाईल वापरकर्त्यांना कसे शिकार बनवत आहेत हे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाळ विठ्ठलल यांनी सांगितले आहे. असाच एक प्रकार आता व्हीआय(Vi) सब्सक्राइबर्समध्येही दिसून येत आहे, जिथे व्होडाफोन आयडियाचे कर्मचारी बनून फसवणूक करणारे लोक त्यांचा वैयक्तिक डेटा लोकांकडून घेत आहेत आणि वापरकर्त्यांना धमकावत आहेत. यापासून सावध राहावे, असे कंपनीच्यावतीने ग्राहकांना सांगण्यात आले आहे.

संबंधित बातम्या:

सावधान! व्होडाफोन आयडियाने आपल्या 27 कोटी वापरकर्त्यांना दिला इशारा, जिओ आणि एअरटेल वापरकर्त्यांनीही सतर्क रहा

व्होडाफोन, आयडिया युजर्ससाठी आनंदाची बातमी, आता या 23 रिचार्ज पॅकवर मिळवा 60 रुपयांपर्यंत कॅशबॅक

Good News! आता एकच अकाऊंट 25 जणांमध्ये वापरा, Idea आणि Vodafone ची धमाकेदार ऑफर

Non Stop LIVE Update
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.