नाण्याच्या खाली असलेल्या या चिन्हाचा अर्थ काय आहे? जाणून घ्या याचे कारण

| Updated on: May 12, 2021 | 7:00 PM

सध्या आपल्या देशात 2000, 500, 200, 100, 50, 20, 10, 5, 2 आणि 1 रुपयांच्या नोटा प्रचलित आहेत. या व्यतिरिक्त 1, 2, 5, 10, 20 रुपयांची नाणी भारतात प्रचलित आहेत. (What does this symbol under the coin mean? know the reason)

नाण्याच्या खाली असलेल्या या चिन्हाचा अर्थ काय आहे? जाणून घ्या याचे कारण
नाण्याच्या खाली असलेल्या या चिन्हाचा अर्थ काय आहे?
Follow us on

नवी दिल्ली : आपल्या देशात अनेक प्रकारच्या पेमेंट सुविधा आहेत. येथे आपण रोख, चेक, नेट बँकिंग, डिजिटल ट्रान्झॅक्शन अशा बर्‍याच मोडमध्ये पैसे देऊ शकता. सध्या भारतात सर्वाधिक रोकड वापरली जाते. जरी देशात डिजिटल पेमेंट्स लागू झाल्यापासून रोख वापराचा वापर कमी झाला असला तरी तो अद्याप मोड ऑफ पेमेंटच्या सर्वात वर आहे. रोख रकमेमध्ये आपण नोटा आणि नाण्यांच्या सहाय्याने व्यवहार करतो. सध्या आपल्या देशात 2000, 500, 200, 100, 50, 20, 10, 5, 2 आणि 1 रुपयांच्या नोटा प्रचलित आहेत. या व्यतिरिक्त 1, 2, 5, 10, 20 रुपयांची नाणी भारतात प्रचलित आहेत. (What does this symbol under the coin mean? know the reason)

सर्व नाण्यांवर केले जाते विविध अंकांनी चिन्हांकित

दिवसभरात आपण अनेक वेळा नाण्यांचे व्यवहार करत असतो. परंतु आपण कधी नाण्यांवरील विशेष खुणा बारकाईने पाहिल्या आहेत का? आपल्याकडील एखादे नाणे पहा, त्यावर त्या नाण्याचे उत्पादन वर्ष लिहिलेले असते, त्याखाली एखादा बिंदू, स्टार किंवा कट डायमंडसारखे असते. मात्र असेही होऊ शकते तिथे काहीही दिसत नसेल. या सगळ्यामागे एक विशिष्ट कारण आहे.

कोलकाता हा देशातील सर्वात जुना मिन्ट

नाण्यावर उत्पादन वर्षाच्या खाली दिसणारे हे वेगवेगळे चिन्ह हे नाणे कोणत्या शहरात तयार करण्यात आले आहे हे दर्शवितात. ही चिन्हांची मिन्ट(Mint)द्वारे ओळखली जातात. भारतात एकूण 4 मिन्ट आहेत, म्हणजेच देशातील केवळ 4 शहरांत नाणी बनविली जातात. या शहरांमध्ये कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि नोएडाचा समावेश आहे. कोलकाता हा देशातील सर्वात जुना मिन्ट आहे. कोलकाता मिंटची स्थापना 1757 मध्ये झाली.

नोएडामध्ये झाली चौथ्या आणि शेवटच्या मिन्टची स्थापना

कोलकातामध्ये बनवलेल्या नाण्यांवर कोणत्याही प्रकारचे चिन्ह नाही. एखाद्या नाण्यावर कोणत्याही प्रकारचे चिन्ह नसल्यास त्याचा अर्थ असा आहे की ते कोलकाता मिन्टमध्ये बनलेले आहे. मुंबई मिन्टमधील नाण्यांवर कट डायमंड कोरलेले असते. त्याशिवाय मुंबई मिन्टमधील नाण्यांवर B किंवा M ही अंकित केलेले असते. मुंबई मिन्टची स्थापना सन 1829 मध्ये झाली. हैदराबाद मिन्टची स्थापना वर्ष 1903 मध्ये झाली. हैदराबाद मिन्टमध्ये बनवलेल्या नाण्यांवर स्टारचे चिन्ह कोरलेले असते. याशिवाय 1984 मध्ये नोएडा मिन्टची स्थापना झाली. नोएडा मिन्टच्या नाण्यांवर एक साधारण ठिपका बनविला जातो. (What does this symbol under the coin mean? know the reason)

इतर बातम्या

अकोल्यात जात पंचायतीकडून महिलेला थुंकी चाटण्याची शिक्षा; नीलम गोऱ्हेंची गृहमंत्र्यांकडे कारवाईची मागणी

SRPF जवानांना मोठा दिलासा, बदलीसाठी 15 वर्षाची अट रद्द, आदित्य ठाकरेंच्या प्रयत्नांना यश