अॅपलला मागे टाकून मायक्रोसॉफ्ट बनली ‘किंग’, जगातील सर्वात मौल्यवान कंपनीचे बाजारमूल्य किती?

| Updated on: Oct 29, 2021 | 10:48 PM

रॉयटर्समध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, 2020 च्या पहिल्या सहामाहीत मायक्रोसॉफ्टने अॅपलला मागे टाकून जगातील सर्वात मौल्यवान कंपनीचा ताज मिळवला होता. हारग्रीव्स लॅन्सडाऊनचे इक्विटी विश्लेषक लंड येट्स म्हणाले की, पुरवठा साखळी संकटामुळे ऍपलच्या व्यवसायावरही परिणाम होत आहे.

अॅपलला मागे टाकून मायक्रोसॉफ्ट बनली किंग, जगातील सर्वात मौल्यवान कंपनीचे बाजारमूल्य किती?
microsoft
Follow us on

नवी दिल्लीः अॅपलच्या शेअरमध्ये झालेल्या घसरणीमुळे मायक्रोसॉफ्ट जगातील सर्वात मौल्यवान कंपनी बनलीय. सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतर त्याच्या समभागात सुमारे 4 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. अॅपलचा शेअर NASDAQ वर 3.46 टक्क्यांनी घसरून $147.21 वर व्यापार करत होता. सध्या त्याचे बाजारमूल्य $2.41 ट्रिलियन आहे. त्याच वेळी मायक्रोसॉफ्टचा शेअर 1 टक्क्याच्या वाढीसह $ 327.66 च्या पातळीवर व्यवहार करीत होता. त्याचं बाजारमूल्य सध्या $2.46 ट्रिलियन आहे.

गुंतवणूकदारांच्या सुरक्षेच्या बाबतीत मायक्रोसॉफ्ट हा अॅपलपेक्षा चांगला पर्याय

अमेरिकन ग्लोबल इन्व्हेस्टरचे मायकेल माटोसेक यांनी सांगितले की, गुंतवणूकदारांच्या सुरक्षेच्या बाबतीत मायक्रोसॉफ्ट हा अॅपलपेक्षा चांगला पर्याय आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे मायक्रोसॉफ्टच्या व्यवसायातील विविधता आहे. अर्थव्यवस्था मंदावल्यास मायक्रोसॉफ्ट अॅपलपेक्षा चांगले हाताळू शकेल.

मायक्रोसॉफ्टने 2020 मध्येही अॅपलला मागे टाकले होते

रॉयटर्समध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, 2020 च्या पहिल्या सहामाहीत मायक्रोसॉफ्टने अॅपलला मागे टाकून जगातील सर्वात मौल्यवान कंपनीचा ताज मिळवला होता. हारग्रीव्स लॅन्सडाऊनचे इक्विटी विश्लेषक लंड येट्स म्हणाले की, पुरवठा साखळी संकटामुळे ऍपलच्या व्यवसायावरही परिणाम होत आहे. दुसरीकडे मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड व्यवसायात प्रचंड तेजी आलीय.

बाजारमूल्यानं जूनमध्ये प्रथमच $2 ट्रिलियन ओलांडले

जून 2021 मध्ये मायक्रोसॉफ्टने प्रथमच $2 ट्रिलियनच्या बाजारमूल्यासह कंपनीचे शीर्षक मिळवले. अॅपलनंतर $2 ट्रिलियन बाजारमूल्याचा टप्पा ओलांडणारी ही दुसरी अमेरिकन कंपनी ठरली आहे.

यंदा कंपनीचा एकूण महसूल $366 अब्ज

जगातील सर्वात मोठी आयटी कंपनी अॅपलसाठी सप्टेंबरचा तिमाही चांगला राहिला आहे. Apple ने 2020-2021 या आर्थिक वर्षात उदयोन्मुख बाजारपेठांमधून जवळपास एक तृतीयांश कमाई केली आणि भारत आणि व्हिएतनाममधील तिचा व्यवसाय दुपटीने वाढला. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) टिम कुक यांनी ही माहिती दिली. यूएस कंपनीने 25 सप्टेंबर 2021 रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत $83.4 अब्जचा महसूल पोस्ट केला, जो वार्षिक 29 टक्क्यांनी वाढला. या तिमाहीत त्याचे निव्वळ उत्पन्न $20.55 अब्ज होते, जे एका वर्षापूर्वीच्या याच तिमाहीत $12.67 अब्ज होते. सप्टेंबर 2021 ला संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीची एकूण निव्वळ विक्री $365.8 अब्ज होती. अॅपलचे आर्थिक वर्ष 25 सप्टेंबर रोजी संपत आहे.

संबंधित बातम्या

लो-कॉस्ट विम्याचा अभाव, 40 कोटी लोकांना कोणत्याही प्रकारचे आरोग्य विमा संरक्षण नाही

Jan Dhan Account : 7 वर्षांत आतापर्यंत 44 कोटी खाती उघडली, 2 लाखांचा विमा मोफत, जाणून घ्या संपूर्ण तपशील

What is the market value of the most valuable company in the world Microsoft has become the King after Apple?