गव्हाला चांगला भाव, शेतकर्‍यांना मोठा फायदा, नवीन किंमती माहिती आहेत का?

२०२४-२५ च्या मार्केटिंग सीजनसाठी गव्हाचा MSP प्रति क्विंटल २२७५ रुपये होता, तर २०२५-२६ च्या मार्केटिंग सीजनसाठी गव्हाचा MSP प्रति क्विंटल २४२५ रुपये आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह अनेक राज्यांच्या बाजारपेठेत शेतकऱ्यांना गव्हाचे चांगले भाव मिळत आहेत, ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलून आल आहे. वेगवेगळ्या बाजारपेठेतील गव्हाचे नवीनतम भाव जाणून घ्या…

गव्हाला चांगला भाव, शेतकर्‍यांना मोठा फायदा, नवीन किंमती माहिती आहेत का?
गव्हाला आला चांगला भाव
Image Credit source: Tv 9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: Mar 09, 2025 | 3:27 PM

देशभरातील अनेक राज्यांमध्ये आता नवीन गहू पिकांचे आगमन सुरू झाले आहे. पण, गव्हाचे भाव एमएसपीपेक्षा खूपच जास्त आहेत. २०२४-२५ च्या मार्केटिंग सीजनसाठी गव्हाचा MSP प्रति क्विंटल २२७५ रुपये होता, तर २०२५-२६ च्या मार्केटिंग सीजनसाठी गव्हाचा MSP प्रति क्विंटल २४२५ रुपये आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह अनेक राज्यांच्या बाजारपेठेत शेतकर्‍यांना गव्हाचे चांगले भाव मिळत आहेत, ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. वेगवेगळ्या बाजारपेठेतील गव्हाची किंमत जाणून घ्या…

यूपी मंडईतील गव्हाच्या नवीन किंमती पुढीलप्रमाणे

1. आनंदनगर, महाराजगंज मंडईमध्ये कमीत कमी 2300 रु/क्विंटल व जास्तीत जास्त 2400 रू/क्विंटल आणि सरासरी किंमत 2350 रू/क्विंटलआहे.

2.लेड़ि‍यारी, प्रयागराज मंडईमध्ये कमीत कमी 2700 रु/क्विंटल व जास्तीत जास्त 2900 रु/क्विंटल आणि सरासरी किंमत 2780 रु/क्विंटलआहे.

3.सिकंदरा राव, हाथरस मंडईमध्ये कमीत कमी 2650 रु/क्विंटल व जास्तीत जास्त 2730 रु/क्विंटल आणि सरासरी किंमत 2655 रु/क्विंटलआहे.

4.लहरपुर, सीतापुर मंडईमध्ये कमीत कमी2800 रू/क्विंटल व जास्तीत जास्त 2810 रू/क्विंटल आणि सरासरी किंमत 2805 रू/क्विंटल आहे.

5.खैर, अलीगढ़ मंडईमध्ये कमीत कमी 2750 रू/क्विंटल व जास्तीत जास्त 2950 रु/क्विंटल आणि सरासरी किंमत 2850 रू/क्विंटल आहे.

6. पूरनपुर, पीलीभी मंडईमध्ये कमीत कमी 2820 रू/क्विंटल व जास्तीत जास्त 2910 रू/क्विंटल आणि सरासरी किंमत 2865 रु/क्विंटल आहे.

देशातील इतर बाजारपेठेतील गव्हाच्या नवीन किंमती पुढीलप्रमाणे :

1.बड़ा मलहरा, मध्‍य प्रदेश मंडईमध्ये कमीत कमी 2700 रू/क्विंटल व जास्तीत जास्त 2725 रू/क्विंटल आणि सरासरी किंमत 2725 रू/क्विंटल आहे.

2.मूंदी, मध्‍य प्रदेश मंडईमध्ये कमीत कमी 2300 रु/क्विंटल व जास्तीत जास्त 2500 रू/क्विंटल आणि सरासरी किंमत 2475 रू/क्विंटल आहे.

3.सैलाना, मध्‍य प्रदेश मंडईमध्ये कमीत कमी 2400 रू/क्विंटल व जास्तीत जास्त 2500 रु/क्विंटल आणि सरासरी किंमत 2500 रू/क्विंटल आहे.

4.जळगांव, महाराष्‍ट्र मंडईमध्ये कमीत कमी 2500 रू/क्विंटल व जास्तीत जास्त 2695 रू/क्विंटल आणि सरासरी किंमत 2680 रु/क्विंटल आहे.

5.उमरेड़, महाराष्‍ट्र मंडईमध्ये कमीत कमी 2550 रु/क्विंटल व जास्तीत जास्त 3200 रू/क्विंटल आणि सरासरी किंमत 2850 रू/क्विंटल आहे.

6.लालसोट, राजस्थान मंडईमध्ये कमीत कमी 2981 रु/क्विंटल व जास्तीत जास्त 3159 रू/क्विंटल आणि सरासरी किंमत 3025 रु/क्विंटल आहे.

7.कोटा, राजस्‍थान मंडईमध्ये कमीत कमी 2651 रु/क्विंटल व जास्तीत जास्त 3100 रू/क्विंटल आणि सरासरी किंमत 2900 रू/क्विंटल आहे.

8.जंबूसर, गुजरात मंडईमध्ये कमीत कमी 2700 रु/क्विंटल व जास्तीत जास्त 3300 रू/क्विंटल आणि सरासरी किंमत 3000 रु/क्विंटल आहे.

9.बागसरा, गुजरात मंडईमध्ये कमीत कमी 2310 रु/क्विंटल व जास्तीत जास्त 2585 रू/क्विंटल आणि सरासरी किंमत 2447 रु/क्विंटल आहे.

10.उपलेटा, गुजरात मंडईमध्ये कमीत कमी 2125 रु/क्विंटल व जास्तीत जास्त 2445 रु/क्विंटल आणि सरासरी किंमत 2300 रु/क्विंटल आहे.

अनेक राज्यांमध्ये MSP वर गव्हाची खरेदी सुरू  

त्याच वेळी, अनेक राज्यांमध्ये गव्हाची सरकारी खरेदी सुरू झाली आहे आणि शेतकऱ्यांना एमएसपीसह बोनसचा लाभ देखील मिळत आहे. मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना एमएसपीपेक्षा १७५ रुपये बोनस मिळत आहे, ज्यामुळे त्यांना सरकारी खरेदीमध्ये प्रति क्विंटल २६०० रुपये मिळत आहेत. तसेच राज्यात पावसामुळे उत्पादन ओले झाल्यामुळे मध्यप्रदेश सरकारने आता १५ मार्चपासून खरेदी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना ओलावा काढून टाकण्यासाठी वेळ दिला जात आहे, जेणेकरून त्यांना गव्हाची योग्य किंमत मिळू शकेल.