तुमच्या शहरात पेट्रोल कधी आणि कसे स्वस्त होणार; पेट्रोलियम मंत्री म्हणतात…

रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार, आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत. अमेरिकेत कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात मोठी घट झाली. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास अमेरिकेत कच्च्या तेलाचे साठे 3 वर्षांच्या नीचांकावर आलेत.

तुमच्या शहरात पेट्रोल कधी आणि कसे स्वस्त होणार; पेट्रोलियम मंत्री म्हणतात...
पेट्रोल-डिझेल दर
| Edited By: | Updated on: Sep 24, 2021 | 7:42 AM

नवी दिल्लीः जोपर्यंत राज्य सरकार पेट्रोलला जीएसटीच्या कक्षेत आणण्यास सहमत नाही, तोपर्यंत इंधन स्वस्त होईल अशी अपेक्षा करू नका, असं विधान पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी केलंय. वृत्तसंस्था पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, पश्चिम बंगाल सरकारने लादलेल्या जबरदस्त करांमुळे राज्यात पेट्रोलची किंमत 100 रुपये प्रतिलीटर पार झालीय.

कच्चे तेल अधिक महाग होऊ शकते

रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार, आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत. अमेरिकेत कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात मोठी घट झाली. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास अमेरिकेत कच्च्या तेलाचे साठे 3 वर्षांच्या नीचांकावर आलेत. याचा अर्थ अमेरिकेने उत्पादन कमी केलेय. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाची मागणी चांगली आहे. म्हणूनच किमतींमध्ये एकापेक्षा जास्त अमेरिकन डॉलरची वाढ झाली. येत्या काळात कच्चे तेल अधिक महाग होऊ शकते.

पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी काय म्हणाले?

पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले की, केंद्र सरकार पेट्रोलवर 32 रुपये प्रति लीटर कर आकारते. कच्चे तेल $ 19 प्रति बॅरल असताना देखील कर समान होता. कच्च्या तेलाची किंमत आता $ 75 प्रति बॅरल असतानाही कर समान राहतो. ते म्हणाले की, कर म्हणून गोळा केलेल्या रकमेमधून केंद्र सरकार मोफत एलपीजी कनेक्शन रेशन, घर आणि उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत देत आहे. याशिवाय शेतकरी आणि सामान्य माणसासाठी आणखी अनेक योजना चालू आहेत. त्याचबरोबर राज्य सरकारने जुलै महिन्यात कर वाढवून पेट्रोल 3.51 रुपयांनी महाग केले होते. याच कारणामुळे राज्यात पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पुढे गेली.

जीएसटी अंतर्गत आल्यावर पेट्रोल किती स्वस्त?

एका अहवालानुसार, जर पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणले गेले, तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 75 रुपये प्रति लीटरपर्यंत घसरू शकतात.

…तर पेट्रोल खूपच स्वस्त होऊ शकते?

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, केंद्र सरकारला फक्त पेट्रोल आणि डिझेलच नव्हे तर दारू देखील जीएसटीच्या कक्षेत आणायची आहे. परंतु राज्य सरकार त्यांच्यावर लावण्यात आलेल्या करातून प्रचंड उत्पन्न मिळवतात. आतापर्यंत विजेच्या किमतीदेखील जीएसटीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या नाहीत.

संबंधित बातम्या

Gold Silver Price : आज सोने 294 रुपयांनी स्वस्त, पटापट तपासा नवी किंमत

PM नरेंद्र मोदी 27 सप्टेंबरला राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा करणार शुभारंभ, आधारसारखंच होणार युनिक हेल्थ कार्ड, ठरणार फायदेशीर

When and how petrol will become cheaper in your city; The Petroleum Minister says