Gold Silver Price : आज सोने 294 रुपयांनी स्वस्त, पटापट तपासा नवी किंमत

दिल्लीच्या सराफा बाजारात 99.9 टक्के सोने 294 रुपयांनी स्वस्त झाले आहे. गुरुवारी किमती 45,695 रुपयांवरून 45,401 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1768 डॉलर प्रति औंसवर आले आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याची किंमत सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली होती.

Gold Silver Price : आज सोने 294 रुपयांनी स्वस्त, पटापट तपासा नवी किंमत

नवी दिल्लीः शेअर बाजारातील तेजीदरम्यान आज सामान्य माणसासाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. दिल्ली सराफा बाजारात सोने 294 रुपयांपर्यंत स्वस्त झालेय. त्याचबरोबर मागणी वाढल्यामुळे चांदीच्या दरात वाढ दिसून आली. दिल्ली सराफा बाजारात एक किलोच्या किमतीत 26 रुपयांची वाढ झाली. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, दिवाळीपूर्वी सोन्याचे भाव आणखी कमी होऊ शकतात. सध्याच्या पातळीपासून किमती 2000 रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे.

सोन्याचा नवीन दर (Gold Price 23 September 2021)

दिल्लीच्या सराफा बाजारात 99.9 टक्के सोने 294 रुपयांनी स्वस्त झाले आहे. गुरुवारी किमती 45,695 रुपयांवरून 45,401 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1768 डॉलर प्रति औंसवर आले आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याची किंमत सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली होती. ऑगस्ट 2020 मध्ये तो 56,200 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. सध्या सोने 45,401 रुपयांवर आले आहे, म्हणजेच गेल्या 1 वर्षात सोने 10,799 रुपयांपेक्षा स्वस्त झाले आहे.

चांदीची नवीन किंमत (Silver Price 23 September 2021)

चांदीच्या किमतीत किरकोळ वाढ झालीय. दिल्ली सराफा बाजारात चांदी 26 रुपयांपर्यंत महाग झाली. चांदीची नवीन किंमत आता 59,609 रुपये प्रति किलो आहे. याच्या एक दिवस आधी ते 59,583 रुपये प्रति किलो होते. परदेशी बाजारात किंमत 22.78 डॉलर प्रति औंस आहे.

सोन्याचे दर सतत का कमी होतायत? (Gold price down)

अमेरिकन सेंट्रल बँकेच्या फेडरल रिझर्व्हच्या बैठकीनंतर सोने आणि चांदी कमी झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कोणताही बदल केला नाही आणि बॉण्ड खरेदी कार्यक्रम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय.
तज्ज्ञ म्हणतात की, जेव्हा महागाई वाढते तेव्हा चलनाचे मूल्य कमी होते. त्या वेळी लोक पैसे सोन्याच्या स्वरूपात ठेवतात. अशा प्रकारे जेव्हा महागाई बराच काळ उच्च राहते, तेव्हा त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी सोन्याचा वापर केला जातो. RBI च्या मते, जर देशात कोरोनाची दुसरी लाट अनियंत्रित झाली, तर हालचालींवर निर्बंध दीर्घकाळ लागू राहतील. याचा पुरवठा साखळीवर परिणाम होईल. असे झाल्यास महागाई वाढू शकते. अशा परिस्थितीत ते सोन्याच्या किमतीत वाढ दर्शवतात.

संबंधित बातम्या

PM नरेंद्र मोदी 27 सप्टेंबरला राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा करणार शुभारंभ, आधारसारखंच होणार युनिक हेल्थ कार्ड, ठरणार फायदेशीर

PF शी संबंधित ‘या’ 6 मोठ्या सुविधा उमंग अॅपवर मिळणार, सर्व कामं घर बसल्या होणार

Gold Silver Price: Today, gold is cheaper by Rs 294, check the new price

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI