झूम मीटिंगद्वारे ‘त्या’ कंपनीच्या थेट 900 जणांना नारळ, नोकरीवरून काढणारे सीईओ नेमके कोण?

दुसरीकडे 'तुम्ही कामात अतिशय संथ आहात. निवांत डॉल्फिनप्रमाणे तुमचं काम चालतं. काम थांबवा. तत्क्षणी काम थांबवा. तुम्ही मला हतबल करून टाकलं, असंही गर्ग कर्मचाऱ्यांना इमेल करत असल्याचं बोललं जातंय. घर खरेदी प्रक्रिया तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिक वेगवान आणि सुलभ करण्याचा बेटर. कॉमचा उद्देश असल्याचंही त्यांनी म्हटलंय. 

झूम मीटिंगद्वारे 'त्या' कंपनीच्या थेट 900 जणांना नारळ, नोकरीवरून काढणारे सीईओ नेमके कोण?
बेटर डॉट कॉमचे सीईओ विशाल गर्ग

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून झूम मीटिंगद्वारे 900 जणांना नोकरीवरून काढल्याची बातमी चर्चेत आहे. विशेष म्हणजे झूट मीटिंगद्वारे 900 जणांना काढणाऱ्या सीईओची माहिती लोक सोशल मीडियावर सर्च करत आहेत. त्यामुळे साहजिकच अमेरिकेच्या कंपनीचा प्रमुख सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. पण तुम्हाला माहितीय का? या निर्णयानं झूम मीटिंगद्वारे 900 जणांना नारळ देणारे सीईओ विशाल गर्गही नाखूश असल्याचंही सांगितलं जातंय.

असा निर्णय घेतला त्यावेळी मी रडलो होतो

सोशल मीडियावर हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर आता त्यावर टीका होऊ लागलीय. असा निर्णय घेतला त्यावेळी मी रडलो होतो, असं गर्ग यांनी कर्मचाऱ्यांना त्या झूम मीटिंगमध्ये सांगितलं होतं. या मीटिंगमध्ये तसं घडू नये, असं मला वाटत होतं. हे खोटं ठरावं असंही वाटत होतं. त्यांनी नोट्स हातात धरल्या आणि कर्मचाऱ्यांची कामगिरी, उत्पादकता आणि मार्केटमधील बदल यामुळे बेटर. कॉम कंपनीला 15 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करावी लागत असल्याचं त्यांनी सांगितलं.

या प्रकरणानंतर गर्ग यांनी लिहिला निनावी ब्लॉगपोस्ट

कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणं आणि ते सांगणं अतिशय क्लेशदायक असतं आणि विशेषत: या महिन्यात, असं बेटर.कॉमचे मुख्य वित्तीय अधिकारी केव्हिन रायन यांनी एका रिपोर्टमध्ये सांगितलं. विशेष म्हणजे या प्रकरणानंतर गर्ग यांनी निनावी ब्लॉगपोस्ट लिहिल्याचं फॉर्च्युन मासिकाने म्हटलंय. कमी करण्यात आलेले कर्मचारी कामाप्रति निष्ठावान नव्हते. त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे ग्राहक दुसऱ्या कंपन्यांकडे वळले. जेमतेम दोन तास काम करून ही मंडळी आठ तास काम करत असल्याचं भासवत असल्याचंही गर्ग यांनी लिहिल्याचं सांगितलं जातंय. विशेष म्हणजे हर्ष गोयकांनीही या निर्णयावर दुःख व्यक्त केलंय. विशाल गर्गने झूमच्या माध्यमातून काढून टाकलेल्या ९०० कर्मचाऱ्यांना माझे हृदय आले. एकदम चुकीचे, असं हर्ष गोयकांनी ट्विट केलंय.

निवांत डॉल्फिनप्रमाणे तुमचं काम चालतं

दुसरीकडे ‘तुम्ही कामात अतिशय संथ आहात. निवांत डॉल्फिनप्रमाणे तुमचं काम चालतं. काम थांबवा. तत्क्षणी काम थांबवा. तुम्ही मला हतबल करून टाकलं, असंही गर्ग कर्मचाऱ्यांना इमेल करत असल्याचं बोललं जातंय. घर खरेदी प्रक्रिया तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिक वेगवान आणि सुलभ करण्याचा बेटर. कॉमचा उद्देश असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

अधिकारपदी असलेल्या व्यक्तीची वागण्याची ही पद्धत नव्हे

विशेष म्हणजे एखाद्या कंपनीच्या अधिकारपदी असलेल्या व्यक्तीची वागण्याची ही पद्धत नव्हे, असं लिव्हरपूल जॉन मूर्स विद्यापीठातील रोजगार कायदा आणि व्यापार याच्या प्राध्यापक जेमा डेल यांनी म्हटलं. अशा पद्धतीने वागून तुम्ही कर्मचाऱ्यांना दुखावत आहात. तसेच कंपनीचंही नुकसान करत आहात. कर्मचाऱ्यांना कशा प्रकारची वागणूक मिळते हे बेटर.कॉमच्या कर्मचाऱ्यांना कळलं आहे, असंही त्यांनी अधोरेखित केलंय. समाधानकारक काम होत नसेल तर कारवाई करण्याचा अधिकार कंपनीला असतो. पण तसं करताना वागण्याची कायदेशीरदृष्ट्या आणि नैतिकदृष्टया एक पद्धत असते, हेसुद्धा त्यांनी नमूद केलंय.

संबंधित बातम्या 

अखेर प्रतिक्षा संपली; 15 डिसेंबरपासून होणार ओला ई-स्कूटरचे वितरण

31 डिसेंबपर्यंत दाखल करता येणार ‘आयटीआर’; आयकर विभागाकडून जनजागृती

Published On - 10:24 pm, Tue, 7 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI