AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हुआंग यांच्यानंतर Nvidia चे नेतृत्व कोणाकडे ?, भारतीय वंशाचे Jay Puri यांचे नाव चर्चेत..

दिग्गज कंपनी Nvidia त्यांचे सीईओ जेनसन हुआंग यांच्या अफेअरमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. जेनसन यांच्या जागी आता सीईओ कोण होणार याची चर्चा सुरु असताना भारतीय वंशाचे जय पुरी यांचे नाव चर्चेत आले आहे. कोण आहेत जय पुरी ?

हुआंग यांच्यानंतर Nvidia चे नेतृत्व कोणाकडे ?, भारतीय वंशाचे Jay Puri यांचे नाव चर्चेत..
Jensen Huang and jay puri
| Updated on: Nov 11, 2026 | 11:04 PM
Share

जगातील सर्वात मोठी टेक कंपनी Nvidia ही सीईओ जेनसन हुआंग यांच्या चीनी महिलेशी सुरु असलेल्या लव्ह अफेअरवरुन चर्चेत आहे. कंपनीच्या संचालक बोर्डाने हुआंग यांच्या नेतृत्वावर जरी भरोसा दाखवला असला तर त्यांच्या विरोधात सुरु असलेल्या चौकशीने प्रश्न निर्माण झाले आहेत. आता या चौकशीत जर ते दोषी आढळले तर या कंपनीचे नेतृत्व कोण करणार अशी चर्चा सुरु आहे. आता जगातील सर्वात मोठ्या टेक कंपनीची धुरा भारतीय वंशाच्या जय पुरी यांच्याकडे सोपवली जाईल का अशी चर्चा सुरु झाली आहे.

भारतीय वंशाचे माजी वरिष्ठ अधिकारी जय पुरी यांच्या नावाची चर्चा आता पाश्चात्य जगातील मीडियात सुरु आहे. तसेच त्यांच्या सोबतच कंपनीचे चीफ फायनान्शियल ऑफिसर (CFO) कोलेट क्रेस आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पर्याय म्हणून पाहिले जात आहे. Nvidia कंपनीने आता पर्यंत त्यांचा पुढील CEO घोषीत केलेला नाही.

कोण आहेत जय पुरी?

जय पुरी हे Nvidia कंपन्याच्या जुन्या आणि अनुभवी अधिकाऱ्यात समाविष्ठ आहेत.त्यांनी साल 2005 मध्ये कंपनी जॉईंट केली होती. साल 2009 मध्ये त्यांच्या खांद्यावर बिझनस आणि सेल्सची जबाबदारी सोपवली होती. कंपनीच्या ग्लोबल सेल्स, बिझनस पार्टनरशिप आणि ग्राहकांशी संबंधित काम देखील ते सांभाळत होते. त्यांनी 24 ऑगस्ट 2026 रोजी आपल्या कार्यकारी पदावरुन निवृत्ती घेतली होती. मात्र, बदलाच्या प्रक्रियेत ते कंपनीच्या सिनियर एडव्हायजरच्या रुपात ते पुन्हा जोडले जाणार होते. सध्या त्यांना अधिकृतपणे CEO पदाचे उमेदवार म्हणून कपनीने जाहीर केलेले नाही.

ही नावे देखील चर्चेत

जय पुरी यांच्या शिवाय Nvidia चे CFO कोलेट क्रेस हे देखील शर्यतीत आहेत. इयान बक, बिल डॅली, क्रिस मालाचोव्स्की, डेबोरा शॉक्विस्ट यांची नावे देखील आहेत. ही सर्व मंडळी सध्या Nvidia च्या कोणता न कोणत्या पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यामुळे ही सर्वच नावे महत्वाची आहेत.

जेनसन हुआंग संदर्भात

जेनसन हुआंग साल 1993 मध्ये Nvidia ची स्थापना केली होती आणि तीन दशकाहून अधिक काळ ते कंपनीचे नेतृत्व करत आहेत. कंपनीच्या रणनिती आणि निर्णयात त्यांची भूमिका मोठी आहे.हेच कारण आहे की त्यांच्यानंतर कंपनीचे नेतृत्व सांभाळणाऱ्या व्यक्तीला शोधणे कठीण आहे. सध्या Nvidia च्या संचालक मंडळाने हुआंग यांच्यावर विश्वास दाखवला आहे. अशात सीईओ बदलण्याचा कोणताही निर्णय समोर आलेला नाही. परंतू सध्याच्या घटनाक्रमात कंपनीत नेतृत्वाची पुढच्या पिढी संदर्भात चर्चा सुरु झाली आहे.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!