67 वर्षांनंतर एअर इंडिया टाटा पुन्हा घेणार?, अधिग्रहणासाठी लावली बोली

स्पाइसजेटचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह यांनी कर्जबाजारी विमान कंपनी खरेदी करण्यासाठी त्यांच्या वैयक्तिक क्षमतेनुसार बोली सादर केली, असे सूत्रांनी सांगितले.

67 वर्षांनंतर एअर इंडिया टाटा पुन्हा घेणार?, अधिग्रहणासाठी लावली बोली
एअर इंडिया

नवी दिल्ली: भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक कंपनी, टाटा समूहाची होल्डिंग कंपनी आणि बजेट एअरलाईन स्पाइसजेटचे प्रमुख अजय सिंह यांनी तोट्यात चालणाऱ्या सरकारी कंपनी एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी आर्थिक निविदा सादर केल्यात. निर्गुंतवणुकीची प्रक्रिया करणाऱ्या विभागाचे सचिव तुहिनकांत पांडे यांनी आर्थिक ‘बोली’ मिळाल्याबद्दल ट्विट करत माहिती दिली. परंतु किती कंपन्यांनी निविदा सादर केल्या हे सांगितले नाही. कंपनीनं एअर इंडियासाठी बोली लावण्याचंही टाटा सन्सच्या प्रवक्त्याने सांगितले.

स्पाइसजेटचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह यांनी कर्जबाजारी विमान कंपनी खरेदी करण्यासाठी त्यांच्या वैयक्तिक क्षमतेनुसार बोली सादर केली, असे सूत्रांनी सांगितले. अन्य एका सूत्राने सांगितले की, विमान कंपनीसाठी अनेक आर्थिक बोली प्राप्त झाल्यात. सध्या निविदांबद्दल कोणतीही विशिष्ट माहिती नाही.
आर्थिक बोलींचे मूल्यमापन अज्ञात राखीव किमतीच्या आधारे केले जाणार आहे आणि त्या मानकापेक्षा जास्त किंमत देणारी बोली मंजूर केली जाईल. केंद्रीय मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी शिफारस पाठवण्यापूर्वी व्यवहार सल्लागार सुरुवातीला बोलींचा आढावा घेईल.

टाटा 67 वर्षांनंतर एअर इंडियामध्ये परतणार

जर टाटाची बोली यशस्वी झाली, तर टाटा 67 वर्षानंतर एअर इंडियाला परततील. टाटा समूहाने ऑक्टोबर 1932 मध्ये टाटा एअरलाइन्सची स्थापना केली, ज्याचे नंतर एअर इंडिया असे नामकरण करण्यात आले. सरकारने 1953 मध्ये विमान कंपनीचे राष्ट्रीयीकरण केले.

टाटा ग्रुप विस्तारा चालवतेय

टाटा सिंगापूर एअरलाइन्सच्या भागीदारीत विस्तारा ही प्रीमियम विमान कंपनी चालवते. टाटा समूहाने स्वतःहून किंवा बजेट एअरलाइन्स एअर एशिया इंडियाद्वारे बोली लावली आहे की नाही हे अद्याप माहीत नाही. एअर एशिया इंडिया टाटा सन्स आणि मलेशियाची एअर एशिया इन्व्हेस्टमेंट लिमिटेडसाठी एक संयुक्त उपक्रम आहे.

एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीसाठी आर्थिक निविदा प्राप्त

गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव (डीआयपीएएम) तुहिनकांत पांडे यांनी ट्विटरवर महत्त्वाची माहिती दिली. “व्यवहार सल्लागाराने एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीसाठी आर्थिक बोली प्राप्त केलीय. ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. त्यांनी ना बोलीदारांची माहिती दिली आणि ना किती बोली प्राप्त झाल्या हे सांगितले.

सरकार 100% भागभांडवल विकेल

केंद्र सरकारला सरकारी एअरलाईनमधील आपला 100 टक्के हिस्सा विकायचा आहे, ज्यात एअर इंडिया लिमिटेडचा एआय एक्सप्रेस लिमिटेडमधील 100 टक्के हिस्सा आणि एअर इंडिया एसएटीएस एअरपोर्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचा 50 टक्के हिस्सा आहे.

निर्गुंतवणुकीची प्रक्रिया जानेवारी 2020 मध्ये सुरू

निर्गुंतवणुकीची प्रक्रिया जानेवारी 2020 पासून सुरू झाली होती ती कोविड 19 महामारीमुळे स्थगित झाली. सरकारने संभाव्य बोलीदारांना एप्रिल 2021 मध्ये आर्थिक बोली सादर करण्यास सांगितले होते. 15 सप्टेंबर हा निविदा सादर करण्याचा शेवटचा दिवस होता. टाटा समूह अशा कंपन्यांपैकी एक होता ज्यांनी डिसेंबर 2020 मध्ये एअरलाइन खरेदी करण्यासाठी इंटेलिशन एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (ईओआय) दिला होता.

एअर इंडिया 2007 पासून तोट्यात

2007 मध्ये देशांतर्गत विमान कंपनी इंडियन एअरलाइन्समध्ये विलीन झाल्यापासून एअर इंडिया तोट्यात आहे. एअरलाइनसाठी यशस्वी बोली लावणाऱ्याला देशांतर्गत विमानतळांवर 4,400 देशांतर्गत आणि 1,800 आंतरराष्ट्रीय लँडिंग आणि पार्किंग स्लॉट तसेच परदेशी विमानतळांवर 900 स्लॉटचे नियंत्रण मिळेल. याव्यतिरिक्त कंपनीला एअरलाइनच्या कमी किमतीच्या सेवा एअर इंडिया एक्सप्रेसची 100 टक्के मालकी आणि AISATS ची 50 टक्के मालकी मिळेल. AISATS प्रमुख भारतीय विमानतळांवर कार्गो आणि ग्राउंड हँडलिंग सेवा पुरवते.

संबंधित बातम्या

Gold Silver Rate Today : या आठवड्यात पहिल्यांदा सोन्याचा भाव वधारला, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा दर

सीमकार्ड घेण्यापासून ते मोबाईल टॉवर लावणं आता सोपं, टेलिकॉम कंपन्यांसाठी केंद्राकडून मोठ्या पॅकेजची घोषणा

Will Air India take over Tata again after 67 years?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI