AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2000 रुपयांहून अधिकच्या UPI व्यवहारांवर लागणार GST? चर्चांवर सरकारचे उत्तर काय?

GST on UPI transactions : 2000 रुपयांवरील युपीआय व्यवहारांवर जीएसटी लागणार असल्याची चर्चा देशभरात होत आहे. हा मुद्दा राज्यसभेत सुद्धा उठला. त्यावर केंद्र सरकारने राज्यसभेत उत्तर दिले आहे. काय आहे सरकारचे म्हणणे?

2000 रुपयांहून अधिकच्या UPI व्यवहारांवर लागणार GST? चर्चांवर सरकारचे उत्तर काय?
UPI व्यवहारांवर जीएसटी लागणार?
| Updated on: Jul 27, 2025 | 5:45 PM
Share

2000 रुपयांवरील युपीआय व्यवहारांवर(UPI Transaction) वस्तू आणि सेवा कर लागणार असल्याची चर्चा देशभरात रंगली आहे. तर दुसरीकडे युपीआय व्यवहार मोफत नसल्याचे संकेत भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले होते. त्यामुळे सध्या युपीआय युझर्स धास्तावले आहे. हा मुद्दा राज्यसभेत सुद्धा उठला. त्यावर केंद्र सरकारने राज्यसभेत स्पष्टीकरण दिले आहे.

अर्थ राज्यमंत्र्यांचे उत्तर काय?

वरिष्ठ सभागृहात राज्यसभेत याविषयीचा प्रश्न विचारण्यात आला होता. अर्थ मंत्रालय युपीआय वा 2000 रुपयांपेक्षा अधिक युपीआय व्यवहारांवर जीएसटी लावण्याचा विचार करत आहे का? असा सवाल विचारण्यात आला होता. त्यावर अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी उत्तर दिले. इकोनॉमिक्स टाईम्सने याविषयीचे एक वृत्त दिले आहे. जीएसटी परिषदेने 2000 रुपयांपेक्षा अधिक युपीआय व्यवहारांवर जीएसटी लावण्याचा कोणताच विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे, असे चौधरी यांनी माहिती दिली. जीएसटी धोरण आणि सवलत याविषयीचा निर्णय जीएसटी परिषदेवर अवलंबून असल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांनी सांगितले.

युपीआय व्यवहारांवर आरबीआय गव्हर्नर यांचे संकेत काय?

गेल्या काही दिवसांपासून युपीआय व्यवहार सशुल्क करण्याची चर्चा वेगाने पसरली आहे. गेल्या आठवड्यात फायनेंन्शिअल एक्सप्रेसला आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी मुलाखत दिली. त्यांनी त्यावेळी युपीआय व्यवहार कसे वाढले आहेत याची माहिती दिली. दोन वर्षात चार पट व्यवहार वाढले आहे आणि हा एक विक्रम आहे. त्याचवेळी त्यांनी आता युपीआय व्यवहार सशुल्क करण्याची वकिली केली. कारण युपीआय सिस्टिमसाठी पैसे लागतात. हा डोलारा सांभाळण्यासाठी खर्च करावा लागत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे हा खर्च आता कुणाला तरी उचलावा लागत आहे. तो वापरकर्त्यांनी उचलावा असे त्यांनी ध्वनीत केले होते. त्यांच्या या दाव्याने देशभरात युपीआय व्यवहारांवर शुल्क लागणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यावर कदाचित जीएसटी लावण्यात येईल असे सांगण्यात येऊ लागले. पण आता सरकारने सध्या अशा व्यवहारांवर जीएसटी लागणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था