Gold Price : सोन्याची लकाकी अजून किती दिवस टिकणार? World Gold Council चा मोठा इशारा, सोने यु-टर्न घेणार?

World Gold Council Warning : सोन्याच्या किंमतीत यंदा तुफान आले. सोन्याला या 9 महिन्यातच महागाईचे डोहाळे लागले आहे. सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली. सोने सध्या महागाईच्या शिखरावर आहे. पण ते किती दिवस या उच्चांकावर राहील असा प्रश्न आहे. काय आहे तो इशारा?

Gold Price : सोन्याची लकाकी अजून किती दिवस टिकणार? World Gold Council चा मोठा इशारा, सोने यु-टर्न घेणार?
सोने यु-टर्न घेणार?
Updated on: Oct 11, 2025 | 1:45 PM

सोन्याने 2025 मध्ये सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. सोन्याने रेकॉर्ड मोडत 4000 डॉलर प्रति औंसच्या उंबरठ्यावर पोहचले आहे. भारतात तर काही बाजारात सोने सव्वा लाखांच्या घरात पोहचले. 24 कॅरेट सोने आता सर्वसामान्यांच्या हाताबाहेर पोहचले आहे. सोन्याच्या वाढत्या किंमतींमुळे जगभरातील खरेदीदार आणि गुंतवणूकदार धास्तावले आहे. इतक्या महाग दामाने सोने खरेदी करायचे आणि दर जर घसरले तर? असा प्रश्न त्यांना सतावत आहेत. त्यात आता जागतिक सोने परिषदेने (World Gold Council) धोक्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे सोन्याच्या लकाकीला भूलू नका. काय आहे तो इशारा?

सोन्याचा बाजारा आता बहरला आहे. सोने 4000 डॉलर्सपेक्षा प्रति औंसवर पोहचले आहेत. बाजार सोन्याची दरवाढ रोखू शकलेला नाही. एक दोन दिवस वगळात सोन्याची सातत्याने घोडदौड सुरू आहे. ज्या गतीने सोने आगेकूच करत आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असे वर्ल्ड गोल्ड कॉन्सिलने नमूद केले आहे. या अहवालानुसार, गेल्या महिन्यात जागतिक ईटीएफमध्ये 145.6 टन सोन्यात गुंतवणूक करण्यात आली. त्याचे मूल्य 17.3 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहेत. तर गोल्ड ईटीएफमध्ये 221.7 टन सोने राखीव आहे. याचे मूल्य जवळपास 26 अब्ज डॉलर्स इतके आहे.

WGC ने सोन्याच्या आधारावरील एक्सचेंज ट्रेडेड फंडांवरील त्यांचा मासिक अहवाल जाहीर केला आहे. त्यानुसार तिसऱ्या तिमाहीत विक्रमी गुंतवणूक झाल्याचे म्हटले आहे. तर सप्टेंबरमध्ये 60 टक्क्यांपेक्षा अधिक गुंतवणूक झाल्याचे म्हटले आहे. तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे ॲसेट मॅनेजमेंट उच्चांकावर पोहचले आहेत. तर नोव्हेंबर 2020 पेक्षा यामध्ये 2 टक्क्यांपर्यंत घसरले आहे.

स्थानिक बाजारपेठांमधील गुंतवणूकदारांनी सोन्याकडे मोर्चा वळवला आहे. भारतात सोन्यात 902 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे. शेअर बाजारातील कमकुवत धोरण आणि भू-राजकीय आणि व्यावसायातील चढउताराच्या सत्रामुळे सध्या गुंतवणूकदार सोन्याकडे वळाले आहेत.

त्या धोक्याकडे दुर्लक्ष करू नका

WGC ने एक अहवाल दिला आहे. त्यात इशारा दिला आहे. गुंतवणूकदारांनी मोठी मागणी केल्याने गेल्या काही महिन्यात किंमती शिगेला पोहचल्याचे त्यात म्हटले आहे. किंमतीत लक्षणीय वाढ झाल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. पण याचा अर्थ बाजार सतत याच उच्चांकावर अथवा त्यापेक्षा अधिक उंचीवर जाईल असे नसल्याचे अहवालात म्हटले आहे. अहवालानुसार, किंमतीत केव्हा पण घसरण होऊ शकते. वर्षाच्या अखेरीस अजून तेजी येऊ शकते.