Ratan Tata : रतन टाटा माणुसकीसाठी जीव ओतणारा माणूस, कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी हा विमानाचा किस्सा ऐकाल तर तुम्ही नक्कीच म्हणाल, क्या बात है!

| Updated on: Jan 04, 2023 | 9:16 PM

Ratan Tata : प्रसिद्ध भारतीय उद्योजक रतन टाटा यांच्या स्वभावाचा हा पैलू तुमचे मन जिंकून घेईल.

Ratan Tata : रतन टाटा माणुसकीसाठी जीव ओतणारा माणूस, कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी हा विमानाचा किस्सा ऐकाल तर तुम्ही नक्कीच म्हणाल, क्या बात है!
टाटांचा दिलदारपणा भावला भावा
Follow us on

नवी दिल्ली : प्रसिद्ध भारतीय उद्योजक रतन टाटा (Ratan Tata) हे त्यांचा मृदुस्वभाव, देशप्रेम आणि साधेपणाने ओळखले जातात. त्यांच्याविषयी प्रत्येक भारतीयाला नितांत आदर आहे. त्यांना प्रत्यक्ष न भेटलेला व्यक्तीही त्यांच्या अनेक चांगल्या कामामुळे त्यांचा फॅन आहे. तरुणाई तर त्यांच्यावर फिदा आहे. त्यांनी टाटा समूहाला (Tata Group) उत्तुंग ठिकाणी पोहचवले आहे. त्यांच्या सदगुणांमुळे सर्व कर्मचारीही (Employees) त्यांच्यावर प्रेम करतात. रतन टाटांच्या कृतीमुळे ते कर्मचाऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत. एका कर्मचाऱ्याचा जीव वाचविण्यासाठी त्यांनी विमान उडविण्याची घाई केली होती. आपल्या कर्मचाऱ्याची काळजी घेणारा एवढा दिलदार मालक शोधूनही सापडणार नाही.

टाटा मोठे उद्योजक, व्यावसायिक तर आहेतच पण एक संवेदनशील व्यक्ती ही आहेत. त्यांच्या अनेक धडाकेबाज निर्णयातून, कृतीतून त्यांनी ही गोष्ट सिद्ध केली आहे. रतन टाटा 1991 मध्ये टाटा ग्रुपचे संचालक झाले. 2012 पर्यंत ते या पदावर होते. ते परवानाधारक पायलट सुद्धा आहे.

कर्मचाऱ्याचा जीव वाचविण्यासाठी त्यांनी दाखवलेली लगबग सर्वच कर्मचाऱ्यांच्या लक्षात आहे. कर्मचाऱ्यांची आपल्या मुलासारखी काळजी घेणारे ते वेगळे व्यक्तिमत्व आहे. त्यांना कर्मचाऱ्यांविषयी ममत्व सुद्धा आहे.

हे सुद्धा वाचा

तर ही घटना ऑगस्ट 2004 मध्ये घडली होती. पुणे येथील टाटा मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश एम तेलंग यांची तब्येत अचानक बिघडली. डॉक्टरांनी तपासणी केली. त्यांना तातडीने मुंबईत हलविण्यासाठी एअरलिफ्टचा सल्ला दिला. रविवार असल्याने एअर अॅम्बुलन्सच्या व्यवस्थेत अडथळा आला.

रतन टाटा यांना ही सर्व परिस्थिती समजली. त्यांनी तात्काळ कंपनीच्या विमानाकडे धाव घेण्याची तयारी केली. कंपनीचे विमान उडवण्याचा निर्णय त्यांनी तात्काळ घेतला. पण शर्तीच्या प्रयत्नानंतर एअर अॅम्बुलन्सची व्यवस्थापने व्यवस्था केली. तेलंग यांना मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात हलविण्यात आले.

पण रतन टाटा यांनी अशाही परिस्थितीत कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी दाखविलेली दर्यादिली चर्चेचा विषय ठरली. कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी ते विमान उडवण्यास तयार झाले. पुढे तेलंग यांनी सेवा बजावली आणि 2012 साली ते सेवानिवृत्त झाले. त्याचवर्षी टाटा यांनी ही निवृत्ती घेतली होती.

रतन टाटा हे लायसन्सधारक पायलट आहेत. त्यांच्याकडे द सॉ फाल्कन 2000 हे खासगी जेट पण आहे. त्याची किंमत जवळपास 150 कोटी रुपये आहे. 2011 मध्ये टाटांनी बेंगळुरु विमान शोमध्ये बोईंगच्या F-18 हे सुपर हॉर्नोट विमानात गगनभरारी घेतली होती.