AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ratan Tata यांचा हात पकडून त्यांचा वाढदिवस साजरा करणारा हा माणूस कोण ?

रतन टाटांसोबत अनेकदा पाहिलेला हा कोणता तरुण आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

Ratan Tata यांचा हात पकडून त्यांचा वाढदिवस साजरा करणारा हा माणूस कोण ?
Ratan tata birthdayImage Credit source: Social Media
| Updated on: Dec 28, 2022 | 4:04 PM
Share

भारताचे बिझनेस टायकून रतन टाटा यांचा आज 85 वा वाढदिवस. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी आपला वाढदिवस आपल्या जवळच्या लोकांसोबत अत्यंत सौम्य पद्धतीने साजरा केला. सोशल मीडियावर पुन्हा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात एक तरुण आपला वाढदिवस बिझनेसमन रतन टाटा यांच्यासोबत साजरा करताना दिसत आहे. हा व्हिडिओ दोन वर्ष जुना आहे, जो वाढदिवसाच्या निमित्ताने व्हायरल झालाय. रतन टाटांसोबत अनेकदा पाहिलेला हा कोणता तरुण आहे हे तुम्हाला माहिती आहे का? जर तुम्हाला माहीत नसेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो.

रतन टाटांसोबत झळकणारा दुसरा तिसरा कुणी नसून युवा उद्योजक अर्जुन देशपांडे आहे. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी स्टार्टअप सुरू करणाऱ्या अर्जुनवर रतन टाटा प्रभावित झाले होते.

उद्योगपती रतन टाटा यांनी युवा उद्योजक अर्जुन देशपांडे यांच्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केल्याची माहिती आहे. रतन टाटा यांची भेट कशी झाली, हेही त्यांनी सांगितले.

मी माझ्या स्टार्टअपबद्दल टेड टॉकला गेलो, तेव्हा त्याचा व्हिडिओ रतन टाटांपर्यंत पोहोचला आणि त्यांना तो खूप आवडला. यानंतर त्यांच्याकडून एक दिवस भेटण्याची ऑफर आली आणि मला याची माहिती मिळताच आश्चर्य वाटलं.

10-15 मिनिटांच्या मीटिंगमध्ये मी खूप नर्व्हस झालो होतो. मी कसबसं कामाकडे लक्ष दिलं आणि लोकांना स्वस्त किंमतीत औषधे कशी दिली जाऊ शकतात हे समजावून सांगितले. माझ्या स्टार्टअपबद्दल ऐकून मला खूप आनंद झाला आणि मी गुंतवणूक करण्यास तयार झालो.

अर्जुनने पुढे लिहिले की, “रतन सरांसारखे प्रेरणादायी व्यक्तिमत्व लाभण्याचे भाग्य या देशातील तरुणांना लाभले आहे. उद्यमशीलतेच्या माध्यमातून समाजातील मोठ्या घटकात किती अर्थपूर्ण बदल घडवून आणता येतात, याचं ते जिवंत उदाहरणे आहेत. रतन टाटा सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.” सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहायला मिळत आहे, अर्जुनने आपला आदर्श रतन टाटासोबत केक कापला होता, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.