AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amazon Jobs Cut: ‘नोकरी जाणार’ याचे संकेत आधीच मिळणार! कसं? वाचा काय म्हणाले Amazon चे सीईओ

Amazon मध्ये आतापर्यंत 10 हजार लोकांना नारळ! पण हा आकडा येत्या दिवसात आणखी वाढणार असल्याचे संकेत

Amazon Jobs Cut: 'नोकरी जाणार' याचे संकेत आधीच मिळणार! कसं? वाचा काय म्हणाले Amazon चे सीईओ
नोकऱ्यांवर ग्रहण...Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Nov 18, 2022 | 2:23 PM
Share

मुंबई : कोरोना महामारीच्या काळात अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यानंतर पुन्हा सगळं सुरु झालं. पण नोकऱ्या (Jobs Cut) फार कमी जणांच्या परत आल्या. अशातच आता पुन्हा एकदा मंदीचं (Recession) सावट जगभरातील मोठमोठ्या कंपन्यांवर आहे. त्यामुळे नोकरकपात (Cost cutting) हा मुद्दा येत्या काळात अधिक गंभीर होण्याची दाट भीती व्यक्त केली जातेय. Twitter, Facebook आणि Amazon सह जगभरातील अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी मिळून लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना नारळ दिलाय.

नोकरीवरुन लोकांना काढून टाकण्याचं हे सत्र लवकरच संपण्याची शक्यता कमीच असल्याचं ऍमेझॉन कंपनीचे सीईओ एन्डी जेस्सी यांनी केलंय. ऍमेझॉनमधून नुकत्यात 10 हजार जणांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं होतं. याच मुद्द्यावर बोलताना त्यांनी महत्त्वाची विधानं केली आहेत.

ऍमेझॉन कंपनीचे सीईओ एन्डी जेस्सी यांनी म्हटलंय की,

कंपनीचा तोटा टाळण्यासाठी आणि कंपनीच्या भल्यासाठी नोकरकापत करण्यात आलीय. कंपनीचं दरवर्षी आर्थिक नियोजन करते. हे नियोजन पाहता, येत्या काळात आणखीही काही जणांना नोकरी गमावावी लागू शकते.

संपूर्ण कंपनीतील टीम लीडर्स या दृष्टीने आपआपल्या टीमचा आढावा घेत आहेत. भविष्यात त्यांनी किती जणांची गरज आहे आणि किती जणांची गरज नाही, यावर अभ्यास केला जातोय. कस्टमर वाढवण्यासाठी आणि व्यवसाय फायद्यात आणण्यासाठी काय करायला हवं, यावर विचार केला जातोय.

2023 या वर्षातही ऍमेझॉन कंपनीतून काहींना नोकरी गमवावी लागू शकते. मात्र ज्यांना नोकरीवरुन कमी केलं जाण्याची शक्यत आहे, अशांना 2023 या वर्षाच्या सुरुवातीलाच कल्पना दिली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. आपआपल्या टीम लीडरच्या माध्यमातून नोकरीवरुन कमी करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कळवलं जाणार असल्याचंही एन्डी जेस्सी यांनी म्हटलंय.

याआधी तडकाफडकी लोकांना काढून टाकण्यात आलं होतं, पण यापुढे लोकांना नोकरीवरुन कमी करताना त्यांना आधी पूर्वकल्पना दिली जाईल आणि त्यानंतरच याची सार्वजनिक घोषणा होईल, असंही त्यांनी म्हटलं.

गेल्या काही वर्षांच्या तुलनेत ऍमेझॉन कंपनीने मोठ्या संख्येनं या वर्षात नोकरभरती केली होती. अर्थकारणाची सद्यस्थिती पाहता येणारा काळ नोकऱ्यांसाठी अधिक कठीण असू शकतो, असं भाकितही त्यांनी वर्तवलंय.

त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.