
मुंबई : 10वी किंवा 12वी पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढे करिअर कशात करायचं हा मोठा प्रश्न पडलेला असतो. काही विद्यार्थ्यांनी त्यांना करिअर कशात करायचं आहे हे आधीच ठरवलेलं असतं. पण काही विद्यार्थी त्यांच्या करिअर बाबत कन्फ्यूज असतात. तर अशाच करिअर बाबतीत गोंधळलेल्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही काही करिअरचे सोपे मार्ग सांगणार आहोत.
काही विद्यार्थ्यांना 10 किंवा 12 वी झाल्यानंतर काही कारणांमुळे पुढे शिकण्याची इच्छा नसते. तर अशा विद्यार्थ्यांनी काळजी करण्याची गरज नाही. आता देशात 2G पासून सुरू झालेला प्रवास 5G पर्यंत पोहोचला आहे. तसंच येत्या काळात इंटरनेट अधिक सुलभ होणार आहे. त्यामुळे आता काही अशी कामे आहेत, जी शिकून कोणताही तरुण करिअर करू शकतो.
हे सर्व अभ्यासक्रम आता ऑनलाइन उपलब्ध आहेत. या कोर्सेससाठी फी फार जास्त नाही. हे कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही नोकरी आणि व्यवसाय करू शकता. इंटरनेटची सुविधा उपलब्ध असल्यामुळे, फ्रीलान्स काम करताना तुम्हाला जगभरातून काम मिळू शकते. त्यासाठी फक्त तुम्हाला शिकत राहण्याची इच्छा आणि पुढे जाण्याची भूक असायला हवी आहे. ते म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग, अगदी तसंच.
वेब डिझायनिंग / वेब डेव्हलपर
डिजिटल मार्केटिंग
ग्राफिक डिझायनिंग
व्हिडिओ एडिटींग
फोटोग्राफी/व्हिडिओग्राफी
या पाच अभ्यासक्रमांचा तुम्ही सराव करून सर्व काही शिकू शकाल. त्यामुळे तुम्ही कोणत्याही विषयात यशस्वी होऊ शकता. आणि उत्तम नोकरी मिळवू शकता किंवा स्वतःचा बिझनेसही करू शकता.
कोणत्याही एका क्षेत्रात एक्स्पर्ट असणे महत्वाचे का आहे?
जर तुम्हाला फक्त फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी माहित असेल आणि व्हिडीओ एडिटिंग माहित नसेल तर तुम्हाला या कामासाठी कोणाची तरी मदत घ्यावी लागेल. पण तुम्ही नोकरी करत असाल तर त्यात तुम्हाला काही अडचण नाही. पण जर तुम्ही तुमचा स्वतःचा बिझनेस करत असाल आणि तुम्हाला एडिटींगची माहिती असेल तर तुम्हाला हे काम सहज करता येईल.
आज वेबसाइट ही
प्रत्येकाची गरज बनली आहे. मग कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा कंपनी असो. प्रत्येकाला वेबसाइटची गरज असते. स्वतःची वेबसाइट तयार करण्यासाठी मोठी रक्कम लागत नाही. तसंच ती तयार करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त एक किंवा दोन तास लागतात. जर तुम्हाला डेव्हलपर म्हणून एखादे काम करायचे असेल, तर तेही सहज उपलब्ध आहे कारण क्वचितच असे कोणतेही कार्यालय असेल ज्याची वेबसाइट नसेल.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही हे काम कुठूनही करू शकता. इंटरनेटच्या उपलब्धतेमुळे आता ते सोपे झाले आहे. त्यामुळे तुम्ही यापैकी कोणताही कोर्स करून नोकरी केली तर तुम्हाच्या सॅलरीची सुरूवात 12-15 हजारांपासून होते. तसंच जर तुम्ही बिझनेस करत असाल तर तुम्हाला महिन्याला किती पैसे कमवायचे आहेत हे तुमच्याच हातात आहे.