AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vivo पासून Poco पर्यंत ‘हे’ चार 5G स्मार्टफोन येत्या आठवड्यात होणार लाँच, जाणून घ्या डिटेल्स

मार्च महिन्यात बाजारात स्मार्टफोन लाँच होणार आहे. विवो, सॅमसंग, तसेच पोको यांसारख्या मोठ्या ब्रँडेड कंपन्या त्यांचे फोन सादर करणार आहेत. चला तर मग आजच्या लेखात आपण हे स्मार्टफोनच्या लाँच तारीख जाणून घेऊयात.

Vivo पासून Poco पर्यंत 'हे' चार 5G स्मार्टफोन येत्या आठवड्यात होणार लाँच, जाणून घ्या डिटेल्स
Vivo T5x 5G
| Edited By: | Updated on: Mar 16, 2026 | 10:42 AM
Share

तुम्ही जर नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा कारण पुढच्या आठवड्यात भारतीय बाजारात चार नवीन स्मार्टफोन लाँच होणार आहेत. Vivo T5x 5G, Poco X8 Pro सिरीज आणि Samsung Galaxy M17e 5G पुढील आठवड्यात लाँच केले जाणार आहेत. तर हे स्मार्टफोन कोणत्या वैशिष्ट्यांसह भारतीय बाजारात येतील आणि ते कधी लाँच होतील? चला याबद्दल आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

पोको एक्स 8 प्रो मॅक्स 5जी लाँचिंग तारीख:

पोको एक्स 8 प्रो मॅक्स हा स्मार्ट व्हेरिएंट पुढील आठवड्यात 17 मार्च रोजी पोको एक्स 8 प्रो सोबत लाँच केला जाईल. या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 9500एस प्रोसेसर, 24 जीबी पर्यंत रॅम, 120 एफपीएस गेमिंग, आइस लूप कूलिंग चेंबर, गेम एचडीआर, 9000 एमएएच बॅटरी, 100 वॉट फास्ट चार्जिंग, एआय फीचर्स आणि ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप असेल.

Vivo T5x 5G लाँच तारीख:

विवो कंपनीचा हा आगामी स्मार्टफोन पुढील आठवड्यात 17 मार्च रोजी दुपारी 12 वाजता भारतात लाँच केला जाईल. लाँच झाल्यानंतर हा हँडसेट कंपनीच्या अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त फ्लिपकार्टवर विकला जाईल.

Vivo T5x 5G स्पेसिफिकेशन्स : विवोच्या या फोनमध्ये MediaTek Dimensity 7400 Turbo प्रोसेसर, 7200mAh बॅटरी, रिव्हर्स चार्जिंग आणि मिलिटरी-ग्रेड प्रोटेक्शन असेल.तसेच भारतीय बाजारात हा फोन लवकरच लाँच केला जाणार आहे.

Poco X8 Pro 5G लाँच तारीख:

पोको एक्स 8 प्रो 5जी हा Poco-ब्रँडेड फोन पुढील आठवड्यात 17 मार्च रोजी संध्याकाळी 5;30 वाजता ग्राहकांसाठी लाँच केला जाईल. लाँच झाल्यानंतर तुम्ही हा फोन फ्लिपकार्टवरून देखील खरेदी करू शकाल. हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 8500 अल्ट्रा प्रोसेसर, गेम HDR, 6500mAh बॅटरी, 100W फास्ट चार्जिंग, ड्युअल रिअर कॅमेरा आणि AI फीचर्ससह येईल.

Samsung Galaxy M17e 5G लाँच तारीख:

सॅमसंगचा हा फोन 17 मार्च रोजी भारतीय बाजारपेठेत भव्य एंट्री करणार आहे. 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 6000 एमएएच बॅटरी व्यतिरिक्त या फोनमध्ये सहा वर्षांचा ओएस, सहा वर्षांचा सुरक्षा अपडेट्स, मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 प्रोसेसर आणि सर्कल टू सर्च सारख्या वैशिष्ट्यांसह येईल.

Follow Us
भाजपला धक्का, महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयक संसदेत नामंजूर
भाजपला धक्का, महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयक संसदेत नामंजूर.
मी ॲक्सिस बँकेत... नाशिकमधील धर्मांतरण प्रकरणावर अमृता फडणवीस स्पष्ट म
मी ॲक्सिस बँकेत... नाशिकमधील धर्मांतरण प्रकरणावर अमृता फडणवीस स्पष्ट म.
खरातच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू, फॉरेन्सिक
खरातच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू, फॉरेन्सिक.
लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल, म्हणाल
लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल, म्हणाल.
Amravati Case | मित्राला मुलींचे घाणेरडे व्हिडीओ पाठवायचा नंतर... आरोप
Amravati Case | मित्राला मुलींचे घाणेरडे व्हिडीओ पाठवायचा नंतर... आरोप.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर, मुख्य आरोपी....
संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर, मुख्य आरोपी.....
नाशिक IT प्रकरण, फरार निदा खान या ठिकाणी लपल्याचा दावा, जामीन अर्ज दाख
नाशिक IT प्रकरण, फरार निदा खान या ठिकाणी लपल्याचा दावा, जामीन अर्ज दाख.
उन्हाचा तडाखा वाढला, अहिल्यानगरमध्ये तापमान 41 अंशावर
उन्हाचा तडाखा वाढला, अहिल्यानगरमध्ये तापमान 41 अंशावर.
नाशिक धर्मांतरण प्रकरणी अमित ठाकरे आक्रमक; म्हणाले, मी असतो तर...
नाशिक धर्मांतरण प्रकरणी अमित ठाकरे आक्रमक; म्हणाले, मी असतो तर....
TV9 चॅम्पियनशिप सीझन 2 साठी काऊंटडाऊन सुरू!
TV9 चॅम्पियनशिप सीझन 2 साठी काऊंटडाऊन सुरू!.