AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमचा पुनर्विकास, आमचे निर्णय म्हणत रहिवासी थेट रस्त्यावर, आक्रमक भूमिका घेत..

माहीम येथील मच्छीमार नगरमधील पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काही लोकप्रतिनिधींकडून विधानपरिषदेत रहिवाशांच्या हिताच्या आड येणारी विधाने केली जात असल्याच्या निषेधार्थ मच्छिमार रस्त्यावर उतरल आहेत.

आमचा पुनर्विकास, आमचे निर्णय म्हणत रहिवासी थेट रस्त्यावर, आक्रमक भूमिका घेत..
Mumbai
| Edited By: | Updated on: May 01, 2026 | 11:01 AM
Share

माहीम येथील मच्छीमार नगर (इमारत क्र. 1 ते 20) मधील पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काही लोकप्रतिनिधींकडून विधानपरिषदेत रहिवाशांच्या हिताच्या आड येणारी विधाने केली जात असल्याच्या निषेधार्थ, मच्छीमार नगरमधील 150 हून अधिक स्थानिक रहिवासी रस्त्यावर उतरले. “आमचा पुनर्विकास, आमचे निर्णय” अशी भूमिका घेत रहिवाशांनी कोणत्याही परिस्थितीत फुटणार नाही आणि एकसंध राहून आपला हक्क मिळवू, असा निर्धार जाहीर केला आहे.

रहिवाशांचा तीव्र निषेध आणि शक्तीप्रदर्शन

काही राजकीय नेत्यांनी विधानपरिषदेत मच्छीमार नगरवासीयांना केवळ 550 चौ. फूट घर देण्याचा प्रयत्न केल्यामुळे रहिवाशांमध्ये तीव्र संताप आहे. या विधानाचा निषेध करण्यासाठी सुमारे 150 रहिवासी आणि महासंघाचे सदस्य एकत्र आले आणि त्यांनी औपचारिकपणे आपला विरोध दर्शवला. कोणत्याही अफवांना बळी न पडता, महासंघाच्या नेतृत्वाखाली आम्ही एकजूट राहू आणि आम्हाला हवे असलेल्या अटींनुसारच पुनर्विकास करू, असा ठराव या प्रसंगी सर्वानुमते करण्यात आला.

महासंघाच्या प्रमुख मागण्या व अटी:

PMC (प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार) ने सादर केलेल्या गणितानुसार रहिवासी खालील लाभांवर ठाम आहेत:

1050 चौ. फूट कार्पेट क्षेत्रफळाचे हक्काचे घर.

दरमहा 50,000 रुपये भाडे आणि त्यात दरवर्षी 10% वाढ.

10 लाख रुपये कॉर्पस रक्कम.

निवड प्रक्रिया आणि वेळापत्रक

पुनर्विकासासाठी पारदर्शक ऑनलाइन टेंडर प्रक्रियेद्वारे सक्षम विकासकाची निवड करण्यात येणार आहे. निवडलेला प्रस्ताव थेट म्हाडा कार्यालयात सादर केला जाईल.

टेंडर प्रक्रियेचे महत्त्वपूर्ण टप्पे:

टेंडर दस्तऐवज वितरण: 24 एप्रिल ते 11 मे 2026 (PMC कार्यालय).

प्री-बिड मीटिंग: 12 मे 2026(PMC कार्यालय).

शंकांचे निरसन: 13 मे 2026 (ई-मेलद्वारे).

टेंडर सादर करणे: 16 मे 2026 (सकाळी 11 ते संध्याकाळी 6, महासंघ कार्यालय).

टेंडर उघडणे: 16 मे 2026 (संध्याकाळी 7.30, महासंघ कार्यालय).

बाहेरच्या व्यक्तींनी आमच्या पुनर्विकासात अडथळे आणू नयेत. आम्ही सर्व सभासद एकत्र आहोत आणि महासंघाच्या अधिकृत निर्णयानुसारच आमच्या नगराचा कायापालट होईल,” असे रहिवाशांनी या आंदोलनादरम्यान ठणकावून सांगितले.

Follow Us
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्र
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्री'वरील बैठकीआधीच नॉट रिचेबल
40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेल्या गावाचे
Video | 40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेलं गाव अवशेषांसह आलं वर; पहा व्हिडीओ
'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
Sanjay Raut On Dharavi | 'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता मुंब्य्रात...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट महाजनांच्या भेटीला; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं?
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
Dattatray Bharne | कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, रोहित पवारांच्या उपोषणामुळे हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?