Central Railway Recruitment : नोकरी मिळवा आणि मुंबईकर व्हा ! मध्य रेल्वे मुंबई भरती, लवकरात लवकर अर्ज करा

प्रयोगशाळा अधीक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक, रेडिओग्राफर, आरोग्य निरीक्षक, फार्मासिस्ट, ईसीजी तंत्रज्ञ, नर्सिंग अशा पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. एकूण 22 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया असून अर्ज करायची शेवटची तारीख 13 मे 2022 आहे.

Central Railway Recruitment : नोकरी मिळवा आणि मुंबईकर व्हा ! मध्य रेल्वे मुंबई भरती, लवकरात लवकर अर्ज करा
मध्य रेल्वे मुंबई भरती
Image Credit source: facebook
| Updated on: May 11, 2022 | 3:55 PM

मुंबई : या नोकरीचं ठिकाणच मुंबई आहे त्यामुळे ही नोकरी मिळवून तुम्हाला मुंबईकर व्हायची सुवर्णसंधी आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई (Central Railway Mumbai) अंतर्गत भरती प्रक्रिया (Recruitment Process)सुरु करण्यात आली आहे. प्रयोगशाळा अधीक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक, रेडिओग्राफर, आरोग्य निरीक्षक, फार्मासिस्ट, ईसीजी तंत्रज्ञ, नर्सिंग अशा पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. एकूण 22 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया असून अर्ज (Application) करायची शेवटची तारीख 13 मे 2022 आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीनं खाली दिलेल्या इमेलवर करायचा आहे. 10 वी, 12 वी उत्तीर्ण आणि अन्य उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

शैक्षणिक पात्रता

B.Sc, 10th+ DMLT, 12th Graduation, GNM & More. For Post wise educational qualification details follow notification PDF Given Bellow.

पदाचे नाव

  1. प्रयोगशाळा अधीक्षक (Laboratory Superintendent)
  2. प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assitant)
  3. रेडिओग्राफर (Radiographer)
  4. आरोग्य निरीक्षक (Health Inspector)
  5. फार्मासिस्ट (Pharmacist)
  6. ईसीजी तंत्रज्ञ (ECG Technician)
  7. नर्सिंग (Nursing)

महत्त्वाचे

रिक्त पदे – 22 पदे

नोकरीचं ठिकाण – मुंबई

अर्ज करायची पद्धत – ऑनलाइन

अर्ज पाठवायचा इमेल आयडी – recbbcr@gmail.com

अर्ज पाठवायची शेवटची तारीख – 13 मे 2022

निवड पद्धत- व्हाट्सअप कॉन्फरन्स कॉलवर मुलाखत